कोपरखैरणेत शेकडोंच्या संख्येत स्वच्छतेचा जागर
दिपक देशमुख
नवी मुंबई : नवी मुंबईतील आदित्य हेल्थ ऍण्ड एज्युकेशन सोसायटी संचालित प्रतिभा इन्स्टिटयुट ऑफ नर्सिंग आणि नवी मुंबईमधील सर्व डॉक्टर्स संघटना तसेच कोपरखैरणे ‘ई‘ प्रभाग समितीचे सदस्य डॉ.प्रतिक तांबे यांच्या पुढाकाराने ७ फेबुवारी रोजी रोजी नवी मुंबई येथील कोपरखैरणे येथे नवी मुंबई महानगरपालिका राबवित असणार्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान-२०१८ या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी व स्वच्छतेचा संदेश डॉक्टरांमार्फत सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी स्वच्छता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यांत आले होते.
नवी मुंबई : नवी मुंबईतील आदित्य हेल्थ ऍण्ड एज्युकेशन सोसायटी संचालित प्रतिभा इन्स्टिटयुट ऑफ नर्सिंग आणि नवी मुंबईमधील सर्व डॉक्टर्स संघटना तसेच कोपरखैरणे ‘ई‘ प्रभाग समितीचे सदस्य डॉ.प्रतिक तांबे यांच्या पुढाकाराने ७ फेबुवारी रोजी रोजी नवी मुंबई येथील कोपरखैरणे येथे नवी मुंबई महानगरपालिका राबवित असणार्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान-२०१८ या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी व स्वच्छतेचा संदेश डॉक्टरांमार्फत सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी स्वच्छता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यांत आले होते.
नवी मुंबई महानगरपालिका राबवित असणार्या या स्वच्छते मोहिमेला समाजातील एक जबाबदार घटक म्हणून स्वतःची नैतिक जबाबदारी ओळखून सर्व डॉक्टर्स संघटनांनी या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. प्रतिक तांबे यांनी सर्व संघटनांना केले होते. या आवाहनास अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत नवी मुंबईतील सर्व डॉक्टर्स संघटनेतील पदाधिकारी व डॉक्टर्स तसेच प्रतिभा इन्स्टिटयुट ऑफ नर्सिंगच्या सर्व नर्सेस विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
सकाळी कोपरखैरणेतील डि-मार्ट चौक येथून ऐरोली मतदार संघाचे आमदार संदिप नाईक यांच्या उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाली. तर या रॅलीचा सांगता समारंभ ज्ञानविकास महाविद्यालयाच्या प्रागंणामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी लोकनेते गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पार पडला. रॅलीमध्ये कोपरखैरणे वॉर्डचे सहाय्यक आयुक्त अशोक मढवी व घनकचरा व्यवस्थापन अधिकारी प्रल्हाद खोसे आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
यानंतर प्रतिभा इन्स्टिटयुट ऑफ नर्सिंगच्या विदयार्थीनीनी स्वच्छतेचे महत्व सांगणारे पथनाटय व ओला व सुका कचरा वर्गीकरण आणि आरोग्य विषयक माहिती उपस्थितांना दिली.
याप्रसंगी बोलतांना प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक गणेश नाईक यांनी सांगितले की नवी मुंबई महानगरपालिका हे शहर निर्मितीपासून स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर राहिले आहे व त्यासाठी वेळोवेळी त्यांनी स्वतः व पालिकेच्या महापौर, उपमहापौर व सर्व नगरसेवकांनी तसेच सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाने वेळोवेळी हातभार लावला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवी मुंबई मधील सर्व डॉक्टर्स जनजागृतीसाठी पुढाकार घेत आहेत. ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे व त्यांनी असेही नमुद केले की डॉ. प्रतिक प्रभाकर तांबे यांची ‘‘ई‘‘ प्रभाग समिती सदस्यपदी निवड झाल्यानंतर त्यांनी अतिशय चांगला उपक्रम या रॅलीद्वारे राबविला आहे व डॉक्टर्स संघटनांनी यापुढे ही अशा सामाजिक उपक्रमात हातभार लावावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी बोलताना आमदार संदिप नाईक यांनी नवी मुंबई हे शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी ही केवळ पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांची नसुन सर्व सामान्य जनतेची देखील आहे व या जनतेला याचे महत्त्व समजून सांगण्यासाठी नवी मुंबईतील सर्व डॉक्टर्स व नर्सेस यांनी हा पुढाकार घेतला आहे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.
या प्रसंगी या रॅलीच्या नियोजनाची संकल्पना स्पष्ट करताना रॅलीचे संयोजक डॉ.प्रतिक प्रभाकर तांबे यांनी सांगितले की, नवी मुंबई मधील सर्व डॉक्टर्स हे नेहमीच नगरपालिकेच्या सर्व उपक्रमामध्ये सक्रीय सहभाग घेतात. स्वच्छ सर्वेक्षण अभियान, २०१८ मध्ये सुध्दा सर्व डॉक्टर्स व प्रतिभा इन्स्टिटयुट ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थीनी सहभागी झाले याचा निश्चितच सर्व सामान्य जनतेपुढे चांगला संदेश जाईल. नवी मुंबई महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व सफाई कर्मचारी यांचे डॉक्टर संघटनेतर्फे अभिनंदन करुन या उपक्रमांत आमचा नेहमी सक्रिय सहभाग राहील असे सांगितले.
या रॅलीमध्ये डॉ. एस. टी. गोसावी-अध्यक्ष हिम्पाम, डॉ. एम. आर. काटकर, डॉ. प्रशांत सेठ, डॉ. नितीन गावडे, डॉ. जगताप, डॉ. कृष्णा खडके, डॉ. सौ. विजया तांबे, डॉ. रुपाली गोसावी, डॉ.सीमा गाला, डॉ. वंदना कुचिक, डॉ. निलीमा पवार, डॉ. विनया ठाकूर, डॉ. राम सांगळे, डॉ. रवी गोसावी, डॉ. गौतम जोशी, डॉ. कल्याण घोडके, इतर अनेक डॉक्टर्स तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन अधिकारी श्री. प्रल्हाद खोसे, नगरसेवक श्री. लिलाधर नाईक, समाजसेवक श्री. संदिप म्हात्रे, डि. व्ही. एस. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अपर्णा पाटील, प्रतिभा इन्स्टिटयुट ऑफ नर्सिंगचे व्यवस्थापक किरण शेडगे, शिक्षिका पे्रमा मेहरा, प्रणिता चावके, त्रिवेणी बुटकर, प्राजक्ता काळे, सायली पवार, सर्व कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.