दिपक देशमुख
नवी मुंबई : पनवेल महापालिका आणि झोपडपट्टी सुधारणा व पुनर्विकास आणि सामाजिक विकास समीतीच्या वतीने पनवेल परिसरात पाहणी दौर्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत आज महापलिका हद्दीतील झोपडपट्ट्यांची पाहणी करण्यात आली तसेच स्वच्छते विषयी तेथील नागरीकांना माहिती देण्यात आली.
उपमहापौर चारुशीला घरत आणि समीतीचे सभापती प्रकाश बिनेदार यांनी या वेळी पाहणी केली. पनवेल महापलिका हद्दीतील २६ झोपडपट्ट्यांचे नुकतेच सर्वेक्षण झाले आहे. त्या संर्दभात झोपडपट्टी सुधारणा व पुनर्विकास आणि सामाजिक विकास समीतीच्या वतीने या परिसरातील समस्या जाणून घेण्यासाठी आणि स्वच्छ भारत अभियाना संर्दभात माहिती देण्याकरीता दोन दिवसीय पाहणी दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंर्तगत पंचशील नगर, पोदी-१, पोदी-२, पोदी अडीच तसेच प्रभाग १७ आणि २० मधील झोपडपट्टीला भेट देऊन तेथील रहिवाश्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. या वेळी बांधकाम सभापती अॅड. मनोज भुजबळ, नगरसेवक तेजस कांडपीळे, अजय बहिरा, नगरसेवीका अॅड. वृषाली वाघमारे, सहाय्यक आयुक्त भगवान खाडे, खामकर, बांधकाम विभागाचे साबळे, पाणी पुरवठा अधिकारी अविनाश पाटील, आरोग्य विभाग पदाधिकारी नरेंद्र आबुरकर, प्रधानमंत्री आवास योजनेचे दिपक मडके यांच्यसह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक आणि मान्यवर उपस्थित होते.