सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
प्रभाग समिती सदस्य विजय साळेंच्या प्रयत्नाला यश
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात जुईनगरमधील महानगर गॅस हा राजकीय श्रेयाचा व वादाचा विषय बनला होता. सामाजिक कार्यकर्ते व महापालिका ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे हे गेल्या अनेक वर्षापासून जुईनगर परिसरात महानगर गॅससाठी लेखी पाठपुरावा करत असल्याने आज जुईनगरवासियांना थेट घरात वाहिनीच्या माध्यमातून महानगर गॅस उपलब्ध झाला आहे. महानगर गॅसचे श्रेय विजय साळेंना जावू नये म्हणून स्थानिक भागातील विरोधी राजकीय घटकांनी श्रेयासाठी केविलवाणी धडपड केली असली तरी विजय साळे गेल्या अनेक वर्षापासून महानगर गॅसकरिता पाठपुरावा करत असल्याची प्रतिक्रिया जुईनगरवासियांकडून व्यक्त केली जावू लागल्याने विरोधकांचे पितळ उघडे पडले आहे.
जुईनगरवासियांना त्यांच्या किचनमध्ये थेट वाहिनीतून महानगर गॅस उपलब्ध व्हावा व गॅसच्या प्रतिक्षा त्रासापासून त्यांची सुटका व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय साळे गेल्या अनेक वर्षापासून महानगर गॅसकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. महानगर गॅसचे काम सुरू होताच माजी महापौर डॉ. संजीव नाईक, महापौर जयवंत सुतार, सभागृह नेते रवींद्र इथापे यांच्या उपस्थितीत महानगर गॅसच्या वाहिन्या टाकण्याच्या कामाचा शुभारंभ झाला. हा कार्यक्रम होताच महानगर गॅसचे श्रेय विजय साळेंना जात असल्याचे पाहून स्थानिक भागातील विरोधकांनी हे काम आपणामुळेच झाला असल्याचा टाहो फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु विजय साळे यांच्या करत असलेला लेखी पाठपुरावा गेल्या अनेक वर्षापासूनचा असल्याने विरोधकांचा दावा फसवा असल्याचे स्पष्ट होवून जुईनगरवासियांपुढे त्यांचे पितळ उघडे पडले.
वाहिन्या टाकणे, इमारतीमधील सदनिकांतील किचनमध्ये थेट वाहिनी नेणे, मीटर बसविणे आदी सोपस्कार पार पडल्यावर १० फेब्रुवारी रोजी महानगर गॅस थेट जुईनगरवासियांच्या घरी पोहोचला. जुईनगर सेक्टर २४ मधील महालक्ष्मी सोसायटीमध्ये या कामाचा शुभारंभ झाला. स्थानिक रहीवाशांनी या कामाचे खरे श्रेय असणार्या व या कामासाठी सुरूवातीपासून पाठपुरावा करणार्या विजय साळेंना पाचारण केले व त्यांच्या हस्ते गॅस पेटविला. यामुळे महानगर गॅस आता थेट जुईनगरवासियांच्या किचनपर्यत पोहोचल्याने स्थानिक रहीवाशी विजय साळेंना धन्यवाद देवू लागले आहेत.