सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई :- सारसोळेच्या खाडीअर्ंतगत भागात महाशिवरात्रीच्या दिनी सारसोळेच्या ग्रामस्थांनी कोलवाणी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेला बामणदेवाचा भंडारा भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला.
महाशिवरात्रीच्या दिनी कोलवाणी माता मित्र मंडळाकडून बामणदेवाचा भंडारा दरवर्षी आयोजित केला जात असून यंदाचे भंडार्याचे १३वे वर्ष होते. बामणदेव हा शंकराचा अवतार असल्याने महाशिवरात्रीच्या दिनी या भंडार्याचे आयोजन करण्यात येते. सकाळी पूजा,अभिषेक, त्यानंतर भजने आणि शेवटी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले.
या भंडार्यात सहभागी होण्यासाठी व बामणदेवाचे दर्शन घेण्यासाठी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनवणे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणिस संतोष शेट्टी, शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि सेन्सॉर बोर्ड सदस्य विजय (माऊली) घाटे, शिवसेनेचे माजी नगरसेवक व माजी पक्षप्रतोद रतन नामदेव मांडवे, सिडकोचे माजी संचालक व शिवसेनेचे गोवा प्रदेश सहसंपर्कप्रमुख नामदेव भगत, कॉग्रेसचे माजी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, युवक कॉंग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष निशांत भगत, भाजयुमोचे नवी मुंबई अध्यक्ष दत्ता घंगाळे, स्थायी समितीचे माजी सभापती संपत शेवाळे, माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर, इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत, भाविसेचे बेलापुर विभागप्रमुख विशाल विचारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष गणेशदादा भगत, नगरसेविका सौ. सुजाताताई पाटील, जयश्री ठाकूर, वैजयंती भगत, रूपाली भगत, मिरा पाटील, नगरसेवक काशिनाथ पवार, गिरीश म्हात्रे, ज्ञानेश्वर सुतार, ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे, समाजसेवक रवींद्र भगत, मनसेचे संदीप गलुगडे, नितीन चव्हाण, सनप्रित तुर्मेकर, शिवसेनेचे विभागप्रमुख शिवाजी महाडीक, उपविभागप्रमुख मनोज चव्हाण, युवा सेनेचे निखिल मांडवे, सुशील सुर्वे, भाजपचे विलास चव्हाण, समाजसेवक रवींद्र भगत, प्रल्हादशेठ पाटील, एकनाथ ठाकूर, सोपान सावंत, राजूशेठ आहेर, संतोष खेडेकर, गणेश भंडारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे देवनाथ म्हात्रे, तुकाराम टाव्हरे, महादेव पवार, यशवंत तांडेल, पद्माकर मेहेर, विरेंद्र लगाडे, हरेश भोईर, शिवसेना शाखाप्रमुख शैलेश भोईर, समाजसेवक विवेक सुतार, गणेश पालवे, दिनेश गवळी, शरद पाजंरी, गौतम शिरवाळे, हेमंत पोमण, प्रकल्पग्रस्त संघटनेचे निलेश पाटील, पत्रकार सुर्यकांत वाघमारे, योगेश महाजन, सिध्देश प्रधान, महादेव देशमुख, साईनाथ भोईर, सुर्यकांत गोडसे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अंकित म्हात्रे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह नवी मुंबई, पनवेल, उरण, ठाणे, रायगड भागातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या भंडार्यात दहा हजाराहून अधिक भाविक सहभागी झाले होते.हा भंडारा यशस्वी करण्यासाठी कोलवाणी माता मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सारसोळे गावच्या ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.