सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
मुंबई :- कोकणातील नाणार प्रकल्पावरील बैठीकीच्या निमित्ताने गुरुवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व यांच्याबरोबर वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठीकीच्या अखेरीस ठाणे – मुलुंड दरम्यान नवीन ठाणे या रेल्वे स्थानक लवकर मार्गी लावावे अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झालेल्या भेटीत पत्राद्वारे केली
या भेटीत चर्चा करीत असताना रेल्वे बोर्ड दिल्ली तसेच महाव्यवस्थापक मध्यरेल्वे यांच्याकडून आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या दिनांक ३०/०३/२०१७ रोजी मिळाल्या असून यासाठी ठाणे महापलिकेकडून स्मार्ट सिटी अंतर्गत २८९ कोटी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे . आरोग्य खात्याची १४.८३ एकर जागे पैकी ४.७० एकर वर झालेले अतिक्रमण झोपड्या यांचे पुनर्वसनाची जबाबदारी महपालिकेने उचलेली आहे अशी एकूण १४.८३ एकर जागा मिळवून घेण्यासाठी आरोग्य खात्याचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांच्याकडे प्रलंबित निर्णय आपल्या स्तरावरून तातडीने मागवून घेऊन मंत्री मंडळाच्या बैठकीत लवकरात – लवकर निर्णय घेण्याची मागणी आपल्या भेटीत पत्राद्वारे खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली तसेच एरोली – कळवा एलिव्हेटेड या नवीन रेल्वे मार्गाचे भूमिपूजन डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊन वर्षे उलटले तरी सुद्धा कामाला सुरुवात झालेली नसल्याची खंत व्यक्त केली आहे यासाठी आपल्याकडे असलेल्या एम एम आर डी चे पुनर्वसन अधिकारी यांना पुनर्वसन करण्याचे शासकीय आदेश प्राप्त झाले नसल्याने हे या मार्गातील बाधित होणार्या झोपड्यांचे पुनर्वसन होत नाही कामाला सुरुवात करता येत नाही तसेच यासाठी जिल्हाधिकारी व रेल्वे , एम एम आर डी चे पुनर्वसन अधिकारी यांच्या समवेत सलग्न पाहणी जागेवर करण्यात आली आहे .तरी आपण एम एम आर डी ला पुनर्वसन करण्याचे आदेश तत्काळ द्यावी अशी विनती त्यावेळी करण्यात आली आहे.