दिपक देशमुख
नवी मुंबई :- स्थापन होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या महापौर श्रीम. कविता चौतमोल आणि इतर पदाधिकारी यांनी नवी मुंबई महानगरपालिकेस सदिच्छा भेट देऊन महानगरपालिकेची मालमत्ता कर वसूली प्रणाली व इतर गोष्टींची माहिती घेतली. नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी पनवेल महानगरपालिकेच्या पदाधिकारी व अधिकारी वर्गाचे स्वागत केले. याप्रसंगी स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, परिवहन समितीचे सभापती प्रदिप गवस, माजी महापौर तथा नगरसेवक सुधाकर सोनवणे, नगरसेवक रामचंद्र घरत, अनंत सुतार, माजी महापौर सागर नाईक आदी उपस्थित होते.
या सदिच्छा भेटीप्रसंगी पनवेलच्या महापौर श्रीम. कविता चौतमोल, उपमहापौर श्रीम. चारुशिला घरत, स्थायी समितीचे सभापती श्री. अमर पाटील, सभागृह नेते श्री. परेश ठाकूर, आरोग्य समितीचे सभापती श्री. अरुण भगत, महिला बालकल्याण समिती सभापती श्रीम. दर्शना भोईर, शिक्षण समिती सभापती श्रीम. विद्या गायकवाड, झोपडपट्टी पुनर्विकास समिती सभापती श्री. प्रकाश बिनेदार, बांधकाम समिती सभापती ॲड. मनोज भुजबळ, नगरसेवक श्री. जगदीश गायकवाड, ॲड. वृषाली वाघमारे, श्री. अनिल भगत, श्रीम. लिना गरड, श्री. संतोष शेट्टी, श्री. नितीन पाटील आदी मान्यवर पदाधिकारी तसेच नगरसचिव श्री. अनिल जगधनी, सहा. आयुक्त श्री. चंद्रशेखर खामकर उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा मालमत्ता कर विभागप्रमुख श्री. धनराज गरड तसेच सल्लागार श्री. नारायण मुंडले यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर प्रणालीविषयी माहिती दिली.