दिपक देशमुख
नवी मुंबई : हळदीकुंकू कार्यक्रम घरगुती पध्दतीने अथवा सार्वजनिकरित्या साजरे करण्यात येत असतात. परंतु नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेरूळ नोडमधील प्रभाग ८५मधील उच्चसुशिक्षित नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी घराघरात जावून हळदीकुंकवाचा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करताना महिला वर्गाला कचरा वर्गीकरणाचे महत्व पटवून दिले.
१४ फेब्रुवारीपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी प्रभागातील महिलांकरिता हळदीकुंकू समारंभास सुरूवात केली आहे. या अभियानात नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील या घराघरात जावून महिलांच्या भेटीगाठी घेताना हळदीकुंकवाचा कार्यक्रम करत आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्याही असतात. हळदीकुंकवाच्या माध्यमातून प्रभागातील महिलांना घरामध्ये कचरा साठवणूकीसाठी सुजाताताई या कचर्याचे दोन डबे देत असून त्यात सुका व ओला असे दोन वेगवेगळ्या कचरा ठेवण्याचे आवाहन करून कचरा वर्गीकरणाचे महत्वही पटवून देत आहे. महिलांशी सुसंवाद साधताना सुजाताताई यांनी प्रभागात होत असलेल्या विकासकामांची माहिती संबंधित महिलांना सांगताना नागरी समस्यांबाबतही विचारपुस करताना आढळल्या. महापालिका स्थापनेनंतर प्रथमच स्थानिक लोकप्रतिनिधी निवडणूका नसतानाही घरोघरी येवून सुसंवाद साधत असल्याविषयी व विचारपुस करत असल्याविषयीचे समाधान व्यक्त करत स्थानिक महिलांनी सुजाताताई राबवित असलेल्या उपक्रमाची प्र्रशंसा केली.
घरोघरी हळदीकुंकू करत असताना एकादी सदनिका बंद असल्यास कार्यकर्ते अथवा स्थानिक महिलांनी पुढे चलण्याचा आग्रह केल्यास त्यास सुजाताताई यांनी विनम्रपणे नकार देत त्या बंद सदनिकेच्या शेजारील घरात दोन कचर्याचे डबे ठेवण्याचा कार्यक्रमही राबविला आहे. अनेकदा बंद सदनिकेविषयी कोणी भाडेकरू आहे अथवा मतदारयादीत नाव नसल्याची सूचना केल्यावर त्यावर तात्काळ का त्यांच्या घरात कचरा नसतो असे उत्तर देत सुजाताताईंनी यापुढे अशी सूचना न देण्याचा प्रेमळ सल्लाही संबंधितांना दिला.
सुशिक्षित महिला केवळ घर आणि संसारच सांभाळत नाही, मुलांचे संगोपन करत नाही तर पालकत्वाच्या भूमिकेतून प्रभागाचे आस्थेवाईकपणे नेतृत्वही करते हे नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.