दिपक देशमुख
नवी मुंबई : नागरिकांना चांगल्या दर्जाच्या नागरी सेवा सुविधा पुरविण्याकडे नवी मुंबई महानगरपालिका आरंभापासूनच विशेष लक्ष देत असून कोपरखैरणे येथे नागरिकांच्या सुविधेसाठी अद्ययावत दैनंदिन बाजार उपलब्ध होत असून त्याठिकाणी 95 विक्रेत्यांची सोय होणार आहे याबद्दल समाधान व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी विक्रेत्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णत: टाळावा व स्वच्छ शहराचा आपल्या नवी मुंबई शहराचा नावलौकीक टिकविण्यासाठी बाजारात स्वच्छता कशी राहील याकडे विशेष लक्ष द्यावे असे आवाहन केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 3 कोपरखैरणे मध्ये भू.क्र. 36 येथे 928.36 चौ.मी. क्षेत्रफळात बांधण्यात आलेल्या दैनंदिन बाजार इमारतीच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी महापौर महोदयांसमवेत ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. संदीप नाईक, उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समिती सभापती श्रीम. शुभांगी पाटील, सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, परिवहन समितीचे सभापती श्री. प्रदीप गवस, इ प्रभाग समिती अध्यक्ष तथा स्थानिक नगरसेविका श्रीम. संगीता म्हात्रे, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती सभापती श्रीम. अनिता मानवतकर, नगरसेवक श्री. शंकर मोरे, श्रीम. शशिकला पाटील, श्रीम. सायली शिंदे, श्रीम. छाया म्हात्रे, श्रीम. मेघाली राऊत, श्रीम. लता मढवी, सहा. आयुक्त श्री. अशोक मढवी, माजी नगरसेवक श्री. केशव म्हात्रे, इ प्रभाग समिती सदस्य डॉ. प्रतिक तांबे, श्री. मारुती सकपाळ, श्री. गिरीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार श्री. संदीप नाईक यांनी याप्रसंगी बोलताना नागरी सेवांसाठीचे भूखंड सिडको व इतर प्राधिकरणांनी महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करणेबाबत शासन स्तरावर आपण सातत्याने पाठपुरावा करीत असून कोपरखैरणेतील नागरिकांसाठी एक प्रशस्त व सुनियोजित दैनंदिन बाजार उपलब्ध होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. दैनंदिन बाजार इमारतीस कोपरखैरणे विभागातील समाज सेवक कै. सुरेश काशिनाथ म्हात्रे अशा सेवाभावी वृत्तीच्या व्यक्तीचे नामकरण केल्याबद्दल त्यांनी महापौर व सर्व महानगरगपालिका सदस्यांचे अभिनंदन केले.
2 कोटी 99 लक्ष रक्कम खर्च करून सेक्टर 3 कोपरखैरणे येथील भू.क्र. 36 वर बांधण्यात आलेल्या या मोठ्या आकाराच्या दैनंदिन बाजारात 68 भाजीपाला विक्रीचे तसेच 27 मासळी विक्रीचे ओटले असून यामुळे येथील नागरिकांची चांगली सोय होणार आहे.