सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई :- मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमाचे (जागतिक गुंतवणूकदार परिषद, फेब्रुवारी 2018) औचित्य साधून सिडकोने परवडणारी घरे आणि ब्ल्यू इकॉनॉमी यांवर आधारित एका परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्घाटन मा. श्री. प्रकाश मेहता, गृहनिर्माण मंत्री, महाराष्ट्र यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेस अतिरक्त मुख्य सचिव (गृहनिर्माण) तसेच स्थानिक खासदार व आमदार (विधानसभा व विधानपरिषद) यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
या परिषदेत परवडणारी घरे आणि ब्ल्यू इकॉनॉमी या दोन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. व्यापार, मेरिटाइम बोर्ड आणि गृहनिर्माण या क्षेत्रांतील मान्यवर या विषयांवर आपले विचार मांडतील. महाराष्ट्रातील ‘‘प्
या परिषदेमध्ये एकूण 4 सत्रांचा समावेश असून प्रत्येक सत्रात परवडणारी घरे आणि ब्ल्यू इकॉनॉमी या मुख्य विषयांना अनुसरून विविध मुद्द्यांबाबत विस्तृत चर्चा केली जाईल. आमंत्रित करण्यात आलेले विविध क्षेत्रांतील मान्यवर हे परिषदेतील व्याख्याते आणि तज्ज्ञ (पॅनेलिस्ट) म्हणून भूमिका पार पाडतील.
सिडकोतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट परवडणारी घरे आणि ब्ल्यू इकॉनॉमी या क्षेत्रांचा विस्तार व महत्त्व वृद्धिंगत व्हावे हे आहे. जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करणे अणि त्यायोगे बांधकाम व ब्ल्यू इकॉनॉमी या क्षेत्रांचा जलद गतीने विकास साध्य करणे यामध्ये अंतर्भूत आहे. बांधकाम व जलस्रोत क्षेत्रांचा विकास साधणे व त्या बाबतची चर्चा घडवून यासाठी सदर परिषदेचे आजोयन केले आहे.
नवी मुंबईच्या भविष्याच्या दृष्टिने ही परिषद फायदेशीर ठरेल. परवडणारी घरे आणि ब्ल्यू इकॉनॉमी या क्षेत्रांतील 200 हून अधिक मान्यवर उपस्थित या परिषदेस उपस्थित राहणार आहेत.