दिपक देशमुख
नवी मुंबई : घणसोली मधील श्री प्रतिष्ठा सामाजिक सेवा संस्थाच्या वतीने रविवारी (ता.25) महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती एफ प्रभाग समितीचे सदस्य व श्री प्रतिष्ठा सामाजिक सेवा संस्थाचे अध्यक्ष प्रमोद कदम यांनी दिली.
रविवारी सकाळी साडेदहा वाजता घणसोली ,सेक्टर 6 येथील एका भूखंडावर महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी पालक मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते होणार आहे.तर हळदी कुंकू कार्यक्रमाचे उदघाटन कल्याणी संदीप नाईक यांच्या हस्ते होणार असल्याचे आयोजक प्रमोद कदम यांनी दिली.
याच कार्यक्रमात मनपा अधिकारी,निवृत्त पोलीस अधिकारी,ज्येष्ठ नागरिक,गुणवंत विध्यार्थी ,राष्ट्रीय खेळाडू यांचा गौरव करण्यात येणार आहे.तसेच स्वच्छ सोसायटी स्पर्धा व महिला साठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजिका योजना कदम यांनी दिली.
या महाआरोग्य शिबिरात अपोलो रुग्णालयाचे वैद्यकीय तज्ज्ञ विविध आजारावर उपचार करणार आहेत.तसेच विविध रक्त चाचण्याही करणार असल्याचे आयोजिका योजना कदम यांनी स्पस्ट केले.तसेच कर्क रोग तज्ज्ञ शिशिर शेट्टी यांचे कर्क रोगावर मार्ग दर्शन करणार आहेत असेही आयोजक कडून सांगण्यात आले.
महाआरोग्य शिबिरा साठी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार संदीप नाईक,माजी खासदार संजीव नाईक राहणार आहेत.त्याच बरोबर आमदार शशिकांत शिंदे नरेंद्र पाटील,महापौर जयवंत सुतार,माजी महापौर सागर नाईक,सुधाकर सोनावणे,माजी उप महापौर भरत नखाते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या महाआरोग्य शिबीर व विविध सामाजिक कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक प्रमोद कदम यांनी केले आहे.