सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई :- सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे-गोरे यांचा खूनच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर याचा बालमित्र महेश पळणीकर यानेच ही कबुली दिली आहे. अश्विनी यांची हत्या करुन लाकूड कापण्याच्या मशीनने मृतदेहाचे तुकडे करुन ते वसईच्या खाडीत फेकल्याची धक्कादायक माहितीही महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे यांचा खूनच पळणीकरने दिली आहे.
पळणीकर तसेच कुरुंदकरच्या खासगी गाडीचा चालक कुंदन भंडारी या दोघांना पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी ही माहिती देत दोघांच्याही पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलीसांनी केली. न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांपैकी चौथा आरोपी महेश फळशीकर याने अश्विनी बोद्रे यांची हत्या करुन त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते वसईच्या खाडीत फेकून दिल्याची कबुली दिली आहे. फळशीकर हा कुरुंदकरचा बालपणीचा मित्र आहे. त्याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली होती. दरम्यान, कुरुंदकर याचा ड्रायव्हर कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या दोघांना कोर्टाने १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अश्विनी बिद्रे-गोरे यांची २०१५ मध्ये नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात बदली झाली होती. मात्र, त्या कंळबोली पोलीस ठाण्यात रुजू झाल्याच नव्हत्या तेव्हापासून त्या बेपत्ता होत्या. सांगलीत असताना अश्विनी बिद्रे-गोरे यांची पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्याशी ओळख झाली होती. कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे-गोरे यांच्यात वाद होता. या दोघांमधील वादाचे रेकॉर्डिंगही अश्विनी यांचे पती राजू गोरे यांच्या हाती लागले होते. याशिवाय कुरुंदकर अश्विनी बिद्रे यांना मारहाण करतानाचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते. तुझ्या पतीला गायब करणार, अशा धमक्या कुरुंदकर यांनी अश्विनी यांना दिल्या होत्या.