सुजित शिदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई :- कुकशेत गावामध्ये ११ मार्च ते १३ मार्चदरम्यान कुकशेत गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहासह श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्वानंद सुख ह.भ.प तुकाराम महाराज रानकर यांच्या प्रेरणेने मौजे नविन कुकशेत देवस्थान समितीने या सप्ताहाचे व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे.
नवी मुंबईचे शिल्पकार, ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते या अखंड हरिनाम सप्ताहाचे कलशपुजन होणार आहे. या सप्ताहामध्ये पहाटे ४ ते ६ काकड आरती, सकाळी ८ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण,
सांयकाळी ६ ते ६ हरिपाठ, रात्री ८.३० ते १०.३० हरिकिर्तन होणार आहे.
या सप्ताहामध्ये कोपरखैरणे गावातील ह.भ.प काशिनाथ महाराज वेटा, वाशीगावातील ह.भ.प निलेश महाराज शास्त्री यांची प्रवचने तर दिवेगावातील ह.भ.प बळीराम महाराज नाईक, बोनकोडे गावातील ह.भ.प सनकादिक महाराज म्हात्रे, कोपरी गावातील ह.भ.प नकुल महाराज यांची किर्तने होणार आहेत. १४ मार्च रोजी ह.भ.प सुनिल महाराज रानकर यांचे सकाळी ९ वाजता काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद दिला जाणार आहे.
नेरूळ सेक्टर १४ येथील मौजे नवीन कुकशेत देवस्थान, भुखंड क्रमांक पी-५ (मराठी शाळेच्या समोर) या ठिकाणी होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मौजे नविन कुकशेत देवस्थान समितीने केले आहे.