नवी मुंबई :- नाटय क्षेत्रात आपल्या अंगीकृत कलेतून वेगवेगळी भुमिका बजावत आपला आणि नवी मुंबई शहराचा वेगळा ठसा उमटविणार्या जेष्ठ नाटय कलाकार अशोक पालवे यांना ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय स्पर्धेतून सल नाटकातील उत्कृष्ठ अभिनयाचा राज्यस्तरातून प्रथम क्रमाकांचे सुवर्ण पदक मिळाले आहे. पालवे हे यांना पुरस्कार मिळाल्याबद्ल त्यांच्यावर नवी मुंबईतील सर्वच स्तरातून शुभेच्छाचा वर्षा होत आहे. मराठी नाटकभूमीची सेवा आणि नवे कलाकावर घडविण्यावर आपला यापुढे भर राहिली, अशी प्रतिक्रीया पालवे यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर दिली.
५७ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय स्पर्धा महाराष्ट्रातील १९ केंद्र व ागेव्यातील १ केंद्राची निवड स्पर्धा डिसेंबर २०१७ मध्ये आयोजित करण्यात आली होती. यात ठाणे रायगड, आणि पालघर जिल्हयातील २७ नाटकांची पहिली फेरी पनवेल येथील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाटयगृहात पार पडली. नवी मुंबईतील मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाने सादर केलेल्या विवेक भगत लिखित आणि अशोक पालवे दिग्दर्शित सल या नाटकाला पनवेल येथील निवड फेरीत नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला होता. त्याच बरोबर सल नाटकातील दिग्दर्शना करीता अशोक पालवे यांना प्रथम क्रमाकांचा अभिनय पुरस्कार, स्त्री कलाकारांचा अभिनयाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दिपाली चौगुले यांना तर प्रकाश योजनेचा प्रथम पुरस्कार श्याम चव्हाण यांना आणि द्वितीय क्रमाकांचा रंगभूषेचा पुरस्कार देवा सरकटे यांना मिळाला होता. त्यानंतर महाराष्ट्रातून निवड फेरीत प्रथम क्रमांक मिळविणार्या सल नाटकाने राज्यस्तरातून अंतिम फेरी गाठली होती. ही अंतिम फेरी नुकतिच नांदेड जिल्हयात पार पडली. निवड स्पर्धेतील १९ केंद्रातील प्रथम व द्वितीय क्रमाकांची एकुण ३८ व गोव्यातील १ अशा ३९ नाटकांचा यात समावेश होता. या अंतिम फेरीत सल नाटकातील दिग्दर्शक व जेष्ठ कलावंत अशोक पालवे यांनी पहिला क्रमांक मिळवित सुवर्ण पदक मिळविले आहे. सुवर्ण पदक, सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप होते.