सुजित शिंदे :९६१९१९७४४४
नवी मुंबई : – राज्यातील उपेक्षीत लोककलावंत आणि कलाकारांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या लोककला विकास प्रतिष्ठान, नवी मुंबई यांच्यातर्फे कलाकाराचा मेळावा आणि संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार १२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, डि-मार्टच्या मागे, जुईनगर येथे करण्यात आले आहे.

विरेंद्र लगाडे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात कलाकारांना सरकारी मदत मानधन, आरोग्य, आपत्कालीण निधी राखीव सरकारकडून राखीव ठेवणे या मागणी सोबत जिल्हयात राज्यातील सर्वच जिल्हयात प्रतिष्ठानच्या शाखा स्थापन करण्या विषयी चर्चा केली जाणार आहे. संस्थेला बळकट करण्याच्या अनुषंगाने महिला प्रतिनिधींचीही नेमणूक करण्यात येेणार आहे.
सदर संवाद कार्यक्रमाला संस्थापक मानवेल गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून कलाप्रेमी समाजभूषण उत्तम गायकवाड, पँथर राजन माकणीकर, बी.डी.शिंदे, ऍड.रवींद्र इंगळे, विकास गायकवाड (गुरुजी) उपस्थित राहणार आहेत.
संस्थेमध्ये अनेक पदाधिकारी यांच्या कामाचा लेखा जोगा घेण्यात येणार आहे. ग्रेट आर्टिस्ट शोच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना अल्बममध्ये गाण्यांची संधी उपलब्द करून देण्याविषयी निर्णय घेेण्यात येणार आहे. प्रथम भव्य दिव्य रुपात होणारा मेळावा आणि मार्गदर्शक अशा मेळाव्या महासचिव सिध्दार्थ साळवी, यशवंत शिंदे, तुषार नेवरेकर करीत आहेत.