दिपक देशमुख
नवी मुंबई :- समाजोपयोगी कार्यामुळे तसेच उपक्रमामुळेच शिवसेना आजही जनसामान्यात विशेष स्थान टिकवून आहे. नेरूळ पश्चिमेला शिवसेना शाखा क्रं ८७च्या माध्यमातून गेल्या काही दिवसापासून सतत लोकोपयोगी कार्याचा धडाका सुरू असल्याने ही शिवसेना शाखा चर्चेच्या प्रकाशझोतात येवू लागली आहे. स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी, शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे, युवा सेवा बेलापुर उपविधानसभा अधिकारी निखिल रतन मांडवे आणि माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांच्या प्रयत्नाने व स्थानिक शिवसैनिकांच्या, युवा सैनिकांच्या व महिला आघाडीच्या परिश्रमातून ही शाखा चांगलीच नावारूपाला येवू लागली आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना शाखेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मोफत ओळखपत्राकरिता नोंदणी, अवघ्या ७५ रूपयांमध्ये पॅनकार्ड व अन्य शासकीय योजना स्थानिक नागरिकांना देण्यास रतन मांडवे व अन्य शिवसेना पदाधिकार्यांच्या परिश्रमातून देण्यास सुरुवात झाली आहे. शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी, नगरसेविका सुनिता मांडवे शिवसेना शाखेच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडविताना संघटनात्मक कार्यावर भर देवू लागल्याने या शाखेचा राजकीय क्षेत्रात अल्पावधीतच दबदबा निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. गुढीपाडव्याचे औचित्य साधून या शिवसेना शाखेच्या माध्यमातून केमिकलचा समावेश नसलेल्या आयुर्वेदीक गुळ अवघ्या ६० रूपयांमध्ये उपलब्ध करून देण्यास सुरूवात झाली आहे. या योजनेचा स्थानिक महिला वर्गाने लाभ मोठ्या प्रमाणावर घेतलेला पहावयास मिळत आहे.
सातत्याने विविध योजना शिवसेना शाखेच्या माध्यमातून यापुढेही राबविण्याचा संकल्प शिवसेना शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी व नगरसेविका सौ. सुनिता मांडवे यांनी व्यक्त केला आहे. रतन मांडवे म्हणजे आपल्या घरातला, हक्काचा माणूस अशी प्रतिक्रिया स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.