नवी मुंबई :- नवी मुंबई शहर हे विकसित शहर असून या शहरात राज्यातील परराज्यातील अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. नवी मुंबईत सिंगापूरच्या धर्तीवर फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) झाल्यास पर्यटकांची संख्या वाढून नवी मुंबई एक सुंदर पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपास येऊ शकेल याकरिता नवी मुंबईत सीबीडी येथील आर्टिस्ट व्हिलेज येथे किंवा नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई लगत बटर फ्लाय गार्डन तयार करावे. तसेच नवी मुंबईतील वयोवृद्धांसाठी एक हक्काचे वृद्धाश्रम (ओल्ड एज होम) असावे याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्प (बजेट) 2018 मध्ये भरीव निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांजकडे केली.
देशात वृद्ध दाम्पत्यांकडून इच्छामरणाच्या मागण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत. त्याच बरोबर सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाला सशर्त मान्यता दिली असल्याने इच्छामृत्युचे प्रमाणही वाढले आहे. याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांची संख्याही वाढत आहे. विभक्त कुटुंब पद्धती आणि बदलणारा काळ यामुळे वृद्धाश्रम ही काळाची गरज बनली असून ज्येष्ठांनीही ती स्वीकारली आहे. छोटी छोटी कुटुंबे निर्माण झाल्याने आई-वडिलांवर एकाकी राहण्याची वेळ आली असून मुला-मुलींनाही स्वत:च्या आईवडिलांची जबाबदारी नकोशी वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात (ओल्ड एज होम) मध्ये पाठविण्याचा विचार वाढायला लागला असून घरातच अपमानास्पद वागणूक, दुर्लक्ष करणे, घरातील कामे सांगणे यांसारख्या गोष्टी घडत असतात. इच्छामृत्युमुळे अवयव विकण्याचा काळा बाजार सुरु होऊन भ्रष्टाचार होण्याची शक्यता असून ज्या दाम्पत्यांना कोणीही वारस नसल्याने त्याच्या संपत्तीकरिता घरातील नोकराकडून हत्या झाल्याच्या घटना घडत आहेत. अनेक ज्येष्ठांनाही वृद्धाश्रमच जवळचा वाटू लागला आहे. त्यामुळे अशा जेष्ठांना आधार देण्याची गरज असून त्यांच्यावर इच्छामरण मागण्याची वेळ येऊ नये, याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने नवी मुंबईमध्ये जेष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम (ओल्ड एज होम) काढून जेष्ठ नागरिकांना त्यांचा हक्क मिळवून देण्याकरिता बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईमध्ये वृद्धाश्रम (ओल्ड एज होम) उभारणेकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या २०१८ या वर्षातील अर्थसंकल्प (बजेट) मध्ये भरीव निधीची तरतूदीची मागणी केली आहे.
तसेच नवी मुंबई येथील आर्टीस्ट व्हिलेज, सेक्टर – 8, सीबीडी बेलापूर येथे सुंदर अभयारण्य असून तेथे विविध प्रकारचे पक्षी येत असतात. सदर अभयारण्याची जागा ही सिडकोच्या अधिपत्यात असून जागेचे क्षेत्रफळ ही मोठे आहे. सदर जागेवर किंवा पामबीच रोडच्या बाजूला जी पर्यायी जागा असेल तिथे सिंगापूर येथे असलेल्या फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) सारखे उद्यान बनविल्यास ते एक सुंदर पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपास येऊ शकेल. तसेच उद्यानातील विविध प्रकारचे रंगबेरंगी फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) पाहण्यासाठी पर्यटकांची संख्याही वाढेल त्यामुळे लोकांना रोजगार निर्माण होईल व महापालिकेच्या उत्पन्नात भर पडेल आणि एक सुंदर पर्यटनाला चालना मिळेल. सीबीडी येथील आर्टिस्ट व्हिलेज येथे किंवा नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई लगत बटर फ्लाय गार्डन तयार करण्याकरिता तसेच नवी मुंबईतील वयोवृद्धांसाठी एक हक्काचे वृद्धाश्रम (ओल्ड एज होम) असावे याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्प (बजेट) 2018 मध्ये भरीव निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांजकडे केली.