दिपक देशमुख
नवी मुंबई :- रामनवमीनिमित्त नेरूळ पश्चिमेला सेक्टर सहा परिसरात शिवम गृहनिर्माण सोसायटीमध्ये दरवर्षी साईभंडारा मोठ्या उत्साहाने व भक्तीभावाने साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षीही २३ मार्च ते २५ मार्च यादरम्यान शिवम सोसायटी आणि शिवसाई उत्सव मंडळाच्या संयुक्त विद्यमाने साई भंडार्याचे आयोजन करण्यात आले आहे.
२३ मार्च रोजी सकाळी ७ वाजता श्री साई सद्चरित्र अखंड पारायणास सुरूवात होणार आहे. २४ मार्च रोजी सांयकाळी ६ वाजता श्री साईची पालखी काढण्यात येणार आहे. २५ मार्च रोजी सकाळी ५.१५ वाजता काकड आरती, सकाळी ५.४५ वाजता श्री चे स्नान व पुजा, सकाळी १० वाजता श्री सत्य नारायणाची महापुजा, दुपारी १२ वाजता मध्यान्ह आरती, दुपारी १२.३० भाविकांना महाप्रसाद आणि रात्री १० वाजता धुपारती घेतली जाणार आहे.
या साई भंडार्याच्या आयोजनासाठी शिवम सोसायटीतील युवक व त्यांचा मित्र परिवार गेल्या काही दिवसापासून परिश्रम घेत आहे. नेरूळमधील शिवम सोसायटीच्या साईभंडार्यामध्ये नवी मुंबईतील भाविकांनी मोठ्या उत्साहाने व भक्तीभावाने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसाई उत्सव मंडळाकडून करण्यात आले आहे.