आयुक्तांची बदली होऊ न देण्याचा सामाजिक संस्थांचा निधारर्
पनवेल :- सामान्य जनतेच्या आयुक्तांवरील विश्वासाला तडा देत भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधार्यांनी महापालिका आयुक्तांवर अविश्वास ठराव घेण्यासाठी महासभा बोलाविल्याने सामान्यांच्या आक्रोशाचा उद्रेक होत आहे. काल झालेल्या जनतेच्या विश्वासदर्शक ठरावाचा भाजपा सत्ताधार्यांनी अनादर करून आयुक्तांची मुदतपूर्व बदली करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रवृत्त केल्यास सामाजिक संस्थांचा भव्य मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी काढण्यात येईल, असा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी सर्व संस्थांच्यावतीने सरकार आणि भाजपाला काल प्रसार माध्यमांशी बोलताना दिला.
आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या शिस्तबद्धतेमुळे भाजपाला ते अवघड जागेचे दुखणे झाले आहे. त्यामुळे त्यांना हटविण्यासाठी त्यांनी चंग बांधला आहे. त्यातच भाजपाच्या दोन नगरसेवकांवर बडतर्फीची टांगती तलवार, प्रभाग समित्यांच्या ठरावावर झालेला अपमान त्यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी त्याचे उट्टे काढत हटावची मोहिम काढली आहे. परंतु, त्याच ताकदीने सामाजिक संस्थांनी त्यांची सारी कारस्थाने उळथवून लावण्यासाठी व्युहरचना आखली होती. त्यातही त्यांनी गोंधळ घालणे सुरू ठेवल्याने सामान्य नागरिकांच्या मनातून ते उतरले असल्याचा दावा कडू यांनी केला.
कालच्या मूक आंदोलनातही त्यांनी घोषणाबाजी करून स्वतःचे हसू करून घेतले. जनतेला जाब विचारण्याची छाती न झाल्याने त्यांनी मिडियासमोर आयुक्तांविरोधात गरळ ओकली. तर पोलिसांनी गराडा घातल्याने त्यांना बोंबळण्याशिवाय काहीच पर्याय उरला नाही. सामान्य जनतेने मात्र, तोंडाला काळी पट्टी बांधून भाजपा, सत्ताधारी ठाकूरशाही मोडीत काढली. ठाकूरांच्या २५ वर्षाच्या राजकारणाला काल प्रथमच सामान्य जनतेने उघडपणे विरोध केल्याने ठाकूरशाहीला प्रचंड हादरा बसला आहे.
२६ मार्चला महापालिकेच्या सभागृहात महापौर डॉ. कविता चौतमल यांनी त्यांचे विशेष अधिकार वापरून आयुक्तांवर सत्ताधार्यांनी आणलेल्या अविश्वास ठरावासाठी विशेष सभा बोलाविली आहे. तो ठराव ते मुख्यमंत्र्यांना पाठवतील. त्याला विरोध करत सामाजिक संस्था उच्च न्यायालयात धाव घेतील. तसेच मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांची बदली मुदतपूर्व करून पनवेलच्या जनतेचा अनादर करू नये, अशी विनंती करण्यासाठी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मोर्चा काढण्याचे आयोजन केले आहे.
कालच्या विश्वासदर्शक ठरावाला अभूतपूर्व उपस्थिती लाभल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सामान्य जनतेला त्यांचे हक्क मिळवून देत पनवेलच्या समतोल विकासासाठी सामाजिक संस्थांचा पर्याय सक्षमपणे उभा राहिल्याचे कालच्या मुक आंदोलनातून समोर आले आहे.
भाजपाने गोंधळ घालण्यासाठी घोषणा देत व्यत्यय आणल्याने उपस्थित जनसमुदयाने त्यांना चोख प्रत्युत्तर देत दादागिरी, तानाशाही नही चलेगी अशा घोषणा दिल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते. भाजपाची यातून आणखीच नाचक्की झाली आहे. त्यातच त्यांच्या मुखपत्रात नेहमीप्रमाणे खोटे वृत्त छापून अकलेचे तारे तोडल्याने सर्वत्र छी थूँ होत आहे.
व्यासपिठावर कांतीलाल कडू, अरूण भिसे, कीर्ती मेहरा, दीपक सिंग आणि मंगेश धनावडे उपस्थित होते.
————————————————————————————————————————-
भरत जाधवची धरली गच्छांडी
ठाकूरांचा भाडोत्री कार्यकर्ता असलेला भरत जाधव नावाच्या बोगस रेशनिंग कार्ड दलालाने काल सभेतील एका महिलेला अर्वाच्च शिविगाळ केली. जाधव घोषणा देत असताना त्या महिलेने त्याला हटकताच, तिचा आईवरून उद्धार केला. मात्र, त्या खमक्या महिलेने तिथेच जाधवच्या गच्छांडीला धरल्याने तो लंगडत लंगडत ठाकूरांच्या आश्रयाला गेला. आधी ज्येष्ठ नागरिकांशी हुज्जत मग महिलांशी असभ्य वर्तन करणारी ही संस्कृती त्याच्या र्हासाला कारणीभूत ठरत आहे.