नवी मुंबई :- राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज पाटील यांना कोणतेही काम सांगा व अवघ्या काही मिनिटातच त्या कामाचा निकाल पाहा असे नवी मुंबईच्या राजकारणात सर्वसामान्यांकडून नेहमीच सांगण्यात येते. आज त्याचा प्रत्यय नेरूळ सेक्टर सहामधील स्थानिक रहीवाशांना अनुभवयासही मिळाला.
शुक्रवारी सकाळी नेरूळ सेक्टर सहामधील मल:निस्सारण वाहिन्या चोकअप होवून त्यातील सांडपाणी मल:निस्सारणच्या टाक्यामधून बाहेर येवू लागले. सभोवतालच्या सोसायट्यांना व रहीवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागला. नेरूळ सेक्टर सहामधील शिवम या सिडकोच्या सोसायटीमधील रहीवाशांनी तात्काळ नगरसेवक सुरज पाटील यांना संपर्क साधून समस्येची कल्पना दिली. दोन दिवसावर आलेला साई भंडारा व २४ तासावर आलेली साई पालखी लक्षात घेवून नगरसेवक सुरज पाटील यांनी अवघ्या काही मिनिटातच पालिका कर्मचार्यांच्या माध्यमातून परिसरातील मल:निस्सारण वाहिन्यांची खोलवर सफाई करून कचरा काढण्यास सुरूवात केली. केवळ शिवम सोसायटी समोरीलच नाही तर सेक्टर सहामधील सर्व मल:निस्सारण वाहिन्या व टाक्यांची सफाई नगरसेवक सुरज पाटील यांनी करून घेतली. समस्या जाणून घेतल्यावर अवघ्या काही मिनिटातच समस्येचे निवारण करण्यासोबत सर्व परिसरातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करून घेतल्याबद्दल नेरूळ सेक्टर सहाचे रहिवाशांनी नगरसेवक सुरज पाटलांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.