सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नेरूळ पश्चिमेला असलेल्या शिवम सोसायटीमध्ये रामनवमीच्या दिनी आयोजित केला जाणारा साई भंडारा उत्साहात, भक्तीमय वातावरणात साजरा झाला.
नेरूळ पश्चिमेला सेक्टर सहा परिसरात सिडकोच्या वसाहतीमध्ये ९६ सदनिकांची शिवम ही सोसायटी. रामनवमीच्या दिनी या सोसायटीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून रामनवमी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. रामनवमीच्या आदल्या दिवशी श्री साईचा पालखी सोहळा हा भक्तीचा व श्रध्देचा विषय बनला आहे. शिवम सोसायटीतील रहीवाशी व शिवसाई उत्सव मंडळाच्या माध्यमातून हा साई भंडारा भक्तीभावाने व श्रध्देने साजरा केला जातो. या वर्षी नवी मुंबईचे महापौर व शिरवणे गावचे सुपुत्र जयवंत सुतार यांच्याच हस्ते श्री साईंच्या पालखी सोहळ्याला सुरूवात झाली. या पालखी सोहळ्यात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुरज पाटील. कार्यसम्राट नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील, नगरसेविका जयश्री एकनाथ ठाकूर, महापालिका ब प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर, सुर्यकांत तांडेल, शिवसेनेचे प्रल्हाद पाटील, दिलीप आमले, इमरान नाईक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तुकाराम टाव्हरे, महादेव पवार, यशवंत तांडेल, निलेश दौंडकर सहभागी झाले होते. पालखी सोहळ्यातील भाविकांसाठी मनोज मेहेर यांनी पाणी वाटपाचा कार्यक्रमही आयोजित केला होता. रामनवमीच्या दिनी आयोजित साई भंडार्यामध्ये ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेश नाईक, सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत, नवी मुंबईचे माजी उपमहापौर अशोक गावडे, महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती रामशेठ विचारे, समाजसेवक गुरू चिंचकर, शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे, शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे, विभागप्रमुख शिवाजी महाडीक, समाजसेवक सुनील सुतार, प्रकाश खलाटे, सोळसकर, भाजपचे अमर पाटील, अर्जुन चव्हाण, प्रदीप बुरकुल भंडार्यात सहभागी झाले होते. या साईभंडार्यात ऐरोलीचे आमदार व युवकांचे प्रेरणास्थान असलेलेे संदीप नाईक यांची उपस्थिती सुखावह व भंडार्यात सहभागी झालेल्या भाविकांसाठी उत्साहदायी ठरली. ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांच्या आगमनानंतर ‘अरे आपला ओबामा आला’ ही होणारी कुजबुज संदीप नाईकांविषयीची आपुलकी व जवळीक दाखवून देणारी ठरली. भंडार्यामध्ये हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भंडार्यामध्ये सारसोळे गावातील यशवंत कला सर्कलच्या संगीतमय कार्यक्रमाने भाविकांना मंत्रमुग्ध केले.