सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई :- ऐरोली नोडमध्ये पालिका प्रशासनाकडून धुरफवारणीमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत मनसेचे ऐरोली विभाग अध्यक्ष रूपेश कदम यांनी महापालिकेच्या ‘जी’ विभाग नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्यांकडे या धुरफवारणीतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी एका लेखी निवेदनातून केली आहे.
धुरफवारणीत होत असलेल्या गैरव्यवहारामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याची भीती रूपेश कदम यांनी व्यक्त केली आहे. धुरफवारणीत काम करणारी ठेकेदाराची माणसे बंद घरे, बंद गटारांमध्ये धुरफवारणी व्यवस्थित करत नाहीत. धुरफवारणी वापरले जाणारे औषधही योग्य प्रमाणात नसल्याचे रूपेश कदम यांनी म्हटले आहे. कंत्राटदार महापालिकेच्या अधिकार्यांशी हातमिळवणी करून गैरव्यवहार करत असल्याने या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी रूपेश कदम यांनी केली आहे.