दिपक देशमुख
नवी मुंबई :मनपाच्या डेब्रिज विरोधी पथकातील 16 कर्मचाऱ्यांवर खोटा आरोप ठेऊन कामावर काढून टाकल्यानें त्यांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या आठ वर्ष्या पासून कामावर असणाऱ्या या कर्मचाऱ्यांना अचानक काढल्याने पुढील जीवन जगायचे कसे हा मोठा यक्ष प्रश्न पडला आहे.यावर आयुक्तांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी ते कर्मचारी करत आहेत.
2010 पासून मनपाच्या परिमंडळ 1 व 2 डेब्रिज विरोधी पथकात चार चालक व 12 सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.ह्या कर्मचाऱ्यांचा ठेका सी.डी.अँड सेक्युरिटी या कंपनीला दिला गेला होता.परंतु डेब्रिज टाकणाऱ्या ठेकेदाराला अनधिकृतपणे मदत करता म्हणून घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त तुषार पवार यांनी त्यांना कामावरून काढून टाकले.तश्या आशयाचा पत्रच त्यांनी संबंधित कंपनीला 5 जानेवारीला दिला.तेव्हा पासून हे कर्मचारी बेकार आहेत.
परंतु हे सोळा कर्मचारी रोज कामावर हजर असताना आपले मोबाईल पथक प्रमुखा कडे देत असत.त्यामुळे या कर्मचार्यकडे कोणत्याही डेब्रिज टाकणाऱ्या व्यवसायिकाशी संपर्क साधता येत नव्हते.असे असताना चूकीच्या माहितीच्या आधारे या कर्मचाऱ्यांना कामावरून टाकल्यानें या कर्मचाऱ्याच्या जीवन मरणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. हे सर्व कर्मचारी सध्या कोणत्याही शासकीय सेवेत रुजू होणार नाहीत इतके त्यांचे वय झाल्याने आपले भविष्य पुढील कसे असेल या चिंतेने ग्रासलेले आहेत.तसेच शिक्षण घेत असलेल्या मुलांचे शिक्षण,वृद्ध आई वडिलांच्या चिंतेने त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळला असल्याचे त्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.आपल्याला न्याय मिळावा म्हणून नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याला हे कर्मचारी भेटले परंतु त्याचाही काही फायदा झाला नसल्याचे संबंधित कर्मचाऱ्यानी सांगितले.त्यामुळे यावर आयुक्तांनीच मानवतावादी दृष्टीकोन ठेऊन आम्हाला पुन्हा घ्यावे अशी मागणी कर्मचारी करत आहेत.
याबाबत घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त तुषार पवार यांना विचारले असता,त्यांच्यावर जर अन्याय झाला असेल तर विचार करू असे सांगितले.