* बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी घेतली पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भेट * पालिका आयुक्त डॉ. रामस्वामी एन यांनी नवी मुंबईमध्ये ओल्ड एज होम उभारणेसाठी करिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या २०१८ या वर्षातील अर्थसंकल्प (बजेट) मध्ये भरीव निधीची तरतूद करण्याचा दिला हिरवा कंदील
नवी मुंबई :- जेष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या संदर्भात बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची आज पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या दालनात नुकतीच बैठक संपन्न झाली.
देशात वृद्ध दाम्पत्यांकडून इच्छामरणाच्या मागण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने त्याच बरोबर इच्छामृत्युचे प्रमाणही वाढले आहे.त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांची संख्याही वाढत आहेत. तसेच जेष्ठ नागरिकांकरिता गेले अनेक दिवसांपासून बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांकडे ओल्ड एज होम उभारणेकरीता सतत पाठपुरावा करत होत्या कि जर ओल्ड एज होम उभारल्यास अनेक जेष्ठ नागरिकांना एक चांगल्या प्रकारची सुख सुविधा, डॉक्टरांची सुविधा प्राप्त होईल व एक आशेचा किरण म्हणून जेष्ठ नागरिकांना जीवन जगण्यास मिळेल व इच्छामरण मागण्यांना आळा बसून जेष्ठ नागरिक आनंदमय जीवन जगतील. म्हणून आज पालिका आयुक्त डॉ. रामस्वामी एन यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या २०१८ या वर्षातील अर्थसंकल्प (बजेट) मध्ये भरीव निधीची तरतूद करण्याचा हिरवा कंदील देऊन लवकरच सिडको बरोबर बैठक घेऊन ओल्ड एज होम उभारण्याचा आराखडा तयार करण्यात येईल असे पालिका आयुक्तांनी या बैठकीत सांगितले. तसेच महारष्ट्रात अनेक जेष्ठ नागरिक संस्था असून महाराष्ट्रातील मधील अनेक जिल्यांमध्ये काही वर्षाने असे ओल्ड एज होम उभारतील व इच्छामरण मागण्यांही कमी होतील व एक वयोवृद्ध एक चांगल्या आशेने जगतील म्हणून हा माझा एक प्रयत्न आहे असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगतिले.
तसेच नवी मुंबईतील जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे व जेष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून नवी मुंबईतील अनेक जेष्ठ नागरिक संस्थेकडून आमदार मंदाताई म्हात्रे यांचे कौतुक होत आहेत.