नवी मुबंई : महापालिकेमार्फत नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणेकरिता माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय, नेरुळ व राजमाता जिजाऊ रुग्णालय,ऐरोली याठिकाणी प्रत्येकी 100 खाटांचे रुग्णालय व बेलापूर येथे 50 खाटांचे माता बाल संगोपन केंद्र उभारण्यात आले आहे.
नमुंमपा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आरोग्यविषयक वैद्यकीय सुविधा देण्याकरिता महापालिका आयुक्त डॅा. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली जुलै-2017 मध्ये आरोग्य विभागामार्फत एकूण 129 प्रकारची वैद्यकीय उपकरणे व 97 इन्स्ट्रुमेन्टस् खरेदी करण्याकरिता निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार एकूण 129 पैकी 28 प्रकारची उपकरणे खरेदी करण्यास एकूण रु.15,75,02,127/- इतक्या रक्कमेचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत.
यामध्ये ICU विभागाकरीता आवश्यक व्हेंटिलेटर, Defibrillator, Syringe Pump व NICU विभागाकरीता आवश्यक Ventilator, Baby Warmer, Phototherapy Unit, Resuscitation Warmer, Fetal monitor यासारख्या उपकरणाचा समावेश आहे.
तसेच या व्यतिरिक्त सर्व प्रकारची Operation Table, दंतचिकित्सा विभागाची उपकरणे, निर्जंतुकीकरण विभागाची उपकरणे इ. उपकरणांचादेखील समावेश आहे. यापैकी आतापर्यंत सर्व रुग्णालयात एकूण 21 प्रकारच्या उपकरणाचा पुरवठा झालेला असून काही दिवसांत उर्वरीत उपकरणांचा पुरवठा होणार आहे.
या निविदेमध्ये ज्या उपकरणांकरिता दर प्राप्त झालेले नाहीत अशा उपकरणांकरिता फेरनिविदा मागविण्यात आली असून सदरच्या फेरनिविदा मंजूर होण्याच्या अंतिम टप्प्यावर आहेत. या फेरनिविदेद्वारे प्रयोगशाळेची उपकरणे, भूल देण्याची उपकरणे, ICU विभागाकरीता आवश्यक विविध मॅानिटर्स, नेत्र विभागाची उपकरणे, कान-नाक-घसा विभागाची उपकरणे इ. उपकरणांचा समावेश आहे.
अशाप्रकारे उपरोक्त तिन्ही ठिकाणच्या रुग्णालयांकरीता आवश्यक असलेली उपकरणे नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त होणार असून सदरची रुग्णालये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याकरीता आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनानुसार गतिमान कार्यवाही सुरु आहे.