दिपक देशमुख
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर आठमधील राजीव गांधी उड्डाणपुलालगत असलेल्या रेल्वे रूळालगतसमोरील भागात सिडकोच्या अविकसित, बकाल भुखंडावर शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी स्वच्छता अभियान राबविले.
नेरूळ सेेक्टर आठ परिसरात संजीवनी, त्रिमूर्ती, उन्नती या गृहनिर्माण सोसायटींच्या मागील बाजूस सिडकोचे मोठ्या प्रमाणावर अविकसित भुखंड असून या भुखंडाला बकालपणा आलेला आहे. हे भुखंड सिडकोकडून महापालिकेकडे हस्तांतरीत व्हावे आणि या भुखंडावर नागरी सुविधा निर्माण करता याव्या याकरिता शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे सातत्याने प्र्रशासनदरबारी पाठपुरावा करत आहेत. त्याअगोदर तत्कालीन नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनीही पाच वर्षे पालिका व सिडकोकडे पाठपुरावा केला आहे.
या अविकसित भुखंडावर डेब्रिज पडले असून जंगली झुडपेही वाढली आहेत. या अविकसित भुखंडामुळे संबंधित परिसराला बकालपणा आलेला आहे. या परिसरात बकालपणामुळे भुखंड परिसरात डास वाढीस लागले असून या ठिकाणी साप-नागही दृष्टीस पडले असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
या अकिसित भुखंडामुळे नागरिकांची गैरसोय लक्षात घेता शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी स्वत: जेसीपी लावून या परिसरात स्वच्छता अभियान राबविले. संबंधित भुखंडाचे सपाटीकरण करून घेतले. उन्हामध्ये हे सपाटीकरण सुरू असताना शिवसेना नगरसेविका सौ. सुुुनिता रतन मांडवे, माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे, युवा सेनेचे बेलापुर उपविधानसभा अधिकारी निखिल रतन मांडवे, स्थानिक शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व रहीवाशी उपस्थित होते.