नवी मुंबई :- फसवा-फसवीचा दिवस असताना कुणाला हि न फसवता एप्रिल फुल नव्हे तर एप्रिल कुल असा अनोखा कार्यक्रम आज जुईनगर या ठिकाणी मनसे प्रभाग क्रमांक ८२ च्या वतीने घेण्यात आला . आज प्रदूषणाचा स्थर वाढत असताना झाडे लावा झाडे जगवा असे ब्रीद वाक्य घेवून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला . मनसैनिक व रहिवाश्यांनी २५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी प्रदूषण रोखण्यासाठी झाडे लावण्याची गरज आहे, असे सांगत नवी मुंबईकरांनी असे उपक्रम राबवावेत अशी आशा व्यक्त केली. आपल्या कार्यकर्त्यांचे कौतुक करताना नवी मुंबईकरांच्या आरोग्यासाठी मनसे तत्पर असून असे कार्यक्रम वारवार घेतले जातील, असे काळे यांनी सांगितले. यावेळी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, मनसे महिला सेना उपशहर अध्यक्षा अनिता नायडू, मनविसेचे उपशहर अध्यक्ष संदेश डोंगरे यांनी प्रमुख उपस्थिती लावली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षय शेळके, सुमित फाळके, तेजस निकम, स्वप्नील पोखरकर, केशव दीक्षित, निखील पोखरकर, प्रवीण निकम, धीरज जंगले, साई कृष्णा पिटटा, महेश ढोकळे, प्रसाद फलके, संदीप रासकर यांनी विशेष परिश्रम घेतले.