दिपक देशमुख
नवी मुंबई :- आपण कितीही मोठे झालो तरी शालेय आठवणींचा एक कप्पा आपल्या आयुष्यात कायम असतो. त्या आठवणी कोणी पुसून टाकू शकत नाही. आयुष्याच्या उतारवयातही त्या शालेय आठवणींचा ओलावा कायम असतो. त्यामुळे कितीही वर्षानी शाळेने माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला तरी शाळेत जाण्याचा उत्साह तोच असतो. ऐरोलीमध्ये नुकताच श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालय येथे २१ वर्षांनी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळावा उत्साहात पार पडला. शाळेचे त्या वेळचे विद्यार्थी आता पालक झाले असले तरी शाळेत मात्र किलबिलाट पूर्वीसारखाच झाला.
१९९६-९७ ची बॅच एकूण ५१ विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्व शिक्षकांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका काळे मॅडम, पर्यवेक्षक जोशी सर व प्राथमिक च्या मुख्याध्यापिका गोरे मॅडम व्यासपीठावर उपस्थित होते. याशिवाय खेडकर मॅडम, घोलप सर, सोनसुलकर सर, सांगळे सर, कपले सर, पाचपांडे सर, सूर्यवंशी मॅडम, तावडे मॅडम, बडे मॅडम, म्हात्रे मॅडम, राऊत मॅडम उपस्थित होते.
तसेच प्रमुख पाहुण्यांना शाल,पुष्पगुच्छ व तुळसी चे रोप देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन रुपेश कदम यांनी केले. प्रास्ताविक शितल शाह यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुनील सोमवंशी,संदीप सावंत,सलिल पडवळ,निलेश म्हात्रे व जयंत यंकुळे यांनी परिश्रम घेतले.
२१ वर्षांनी पुन्हा शाळेच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि पुन्हा बालपणी चे दिवस मध्ये रमण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असे आयोजक रुपेश कदम यांनी सांगितले.