दीपक देशमुख
नवी मुंबई :- स्वच्छतेत देशामध्ये प्रथम क्रमांक यावा म्हणून कंबर कसलेल्या नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे आरोग्याकडे मात्र पुरते दुर्लक्ष झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा कायमच बोजवारा उडालेला दिसतो. कधी औषधांचा तुटवडा तर कधी रक्त चाचण्या होत नाहीत. या आणि अशा अनेक समस्यांना मनपा दवाखान्यात नागरिकांना नेहमीच सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे मनपाच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रूग्णालयात शवविच्छेदनासाठी एकच डॉक्टर असल्याने नागरिकांना नागरिकांना शव विच्छेदनासाठी तास न् तास ताटकळत बसावे लागते. नवी मुंबई शहराची लोकसंख्या आजमितीस १५ लाखांच्या घरात पोहोचली. वाशीतील मनपा दवाखान्यात रोज शेकडो रुग्ण येतात. तसेच अपघातग्रस्त रुग्णांची येण्याची संख्यादेखील येथे मोठ्या प्रमाणावर आहे. नवी मुबंई आणि नवी मुंबई बाहेरील अपघात ग्रस्त रुग्ण जेव्हा येथे येतात आणि त्यातील रुग्ण जर दगावले तर तर प्रत्येक रुग्णाचे शवविच्छेदन केल्याखेरीज शव नातेवाईकांच्या ताब्यात दिले जात नाही. शवविच्छेदन करणारा डॉक्टर जर वेळेवर हजर नसेल तर तर नातेवाईकांना शव ताब्यात भेटण्यासाठी तास न् तास ताटकळत बसावे लागते. त्यामुळे नागरीकांमध्ये कमालीची नाराजी पसरली असून पर्यायी अतिरिक्त डॉक्टरची व्यवस्था मनपाने करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
असाच त्रास २ मे २०१८ रोजी चिरनेर साई रोडवर एक बाईक आणि स्वीफ्ट गाडीचा रात्री १० ते १०:३० च्या दरम्यान अपघात झाला. सदर अपघातात केळवणे गावचा अवघ्या २० वर्षाचा तरूण कु. रोहित मधुकर ठाकुर हा जबर जखमी झाला. प्रथम त्याला नेरुळमधील डी .वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आला. परंतु उपचारादरम्यान रोहित याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याकारणाने त्यास रात्री डि. वाय. पाटील हॉस्पिटलमधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये शव विच्छेदन करण्यासाठी रोहित याचे शव आणले, त्याचप्रमाणे आणखी चार मृत्यू झालेले शव त्या ठिकाणी एकामागून एक रात्री पासून पहाटेपर्यंत पाच शव आले होते.
सकाळी शवविच्छेदन करणारे डॉ. जैन ह्यांना संपर्क साधला असता ते म्हणाले माझी प्रकृती ठिक नाही. मी १० वाजेपर्यंत येणार. फक्त एकच डॉक्टर शवविच्छेदन करतात अशी माहीती मिळाली. त्यामुळे नातेवाईकांना त्यांच्याकडे वाट पाहण्याखेरीज दुसरा पर्यायच नव्हता.
आज नवी मुंबई राज्यात ही मोठी महानगरपालिका, परंतू आरोग्याच्या विषयावर पाहिलेली अनास्था विचारात घेता नाम बडे दर्शन खोटे असेच म्हणान्याची वेळ नवी मुंबईकरांवर आलेली आहे. डॉक्टर किरकोळ आजारी होते , उद्या कांही कारणास्तव डॉक्टर येऊच शकले नाही तर रुग्णांच्या नातेवाईकांनी अशीच वाट बघत बसावे का?असा संतप्त सवाल रोहित याच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर जयवंत सुतार, स्थानिक आमदार यांनी एकमेकांना संपर्क साधून ठोस पर्याय जनतेला द्यावा व जनतेची फार मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
याबाबत आरोग्य समिती सभापती उषा भोईर यांनी सांगितले की, शव विच्छेदन करण्यासाठी असणारा एक वैद्यकीय अधिकारी कमी पडत असून दुसरा वैद्यकिय अधिकारी मिळण्यासाठी आयुक्तांना भेटते व मागणी करते असे सांगितले.