नांदेड :- ग्रामीण भागातील भीषण पाणीटंचाई व ग्रामीण जीवनाची विदारकता दाखविणारा सुप्रसिद्ध सिनेनिर्माता महेश कोठारे निर्मित व आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ या मराठी चित्रपटाचा शुभारंभ राज्याचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
हा चित्रपट ग्रामीण जीवनातील विदारक आर्थिक परिस्थिती व पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती या विषयासंदर्भात असून हा चित्रपट कंधार तालुक्यातील एका तांडा वस्ती परिसरात चित्रित करण्यात येणार आहे. चित्रपटाचा शुभारंभ कंधार तालुक्यातील रामनाईक तांडा या ठिकाणी करण्यात आला. यावेळी आ.सौ.अमिताताई चव्हाण, आ.अमरनाथ राजूरकर, चित्रपटाचे निर्माते महेश कोठारे, दिग्दर्शक आदिनाथ कोठारे, सिनेदिग्दर्शक वामन केंद्रे, माजी आ.रोहिदास चव्हाण, चित्रपटातील कलावंत सुबोध भावे, सिद्धार्थ चोप्रा, कंधारचे माजी नगराध्यक्ष रामराव पवार, माजी उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर, प्रशांत चालिकवार, संजय पवार आदिंची उपस्थिती होती.