स्वयंम न्यूज ब्युरो :- ८३६९९२४६४६
नवी मुंबई :- ठाणे बेलापूर मार्गावरील घणसोली, महापे अंडरपास व सविता केमिकल्स येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून सुद्धा वाहनांसाठी खुल्ले करीत नसल्याने या तयार झालेल्या उड्डाणपुलाच्या कामाची पहाणी करण्याकरीता खा. राजन विचारे यांनी आज दौरा आयोजित केला होता. या पाहणी दौऱ्याला एम एम आर डी ए चे उप अभियंता गुरुदत्त राठोड, आकार अभिनय या कंपनीचे कन्सल्टन शेंडे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वाडे व घाडगे , नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधीपक्ष नेते विजय चौगुले, शहरप्रमुख विजय माने ,रत्नागिरी संपर्क प्रमुख मंगेश साळवी नगरसेवक करण मढवी,काशिनाथ पवार ,मनोज हळदणकर ,सुरेश सपकाळ ,बहादूर बीस्ट ,व इतर शिवसेना पदधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते
या सर्वप्रथम घणसोली येथील उड्डाणपूलाची पाहणी करीत असताना एम एम आर डी ए च्या अधिकाऱ्याकडून वॉटर प्युरींनचे काम बाकी आहे असे कारण पुढे केले जात होते याची शहा निशा करण्यासाठी त्यांनी ते सांधे वरील गोणपाट काढून बघावयास सांगितले त्यावेळी असे निर्दशनास आले की याचे वॉटर प्युरींन काम आधी पूर्ण झाले होते .त्यावेळी खासदार राजन विचारे अधिकार्यांना धारेवर धरून हे पूल कोणाच्या उद्घाघटनासाठी थांबले असतील तर थांबवू नका कारण या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते . मुब्रा बायपासचे काम सुरु झाल्याने येथील जड वाहनाची वाहतुकीत भर पडली आहे .अशा वेळी अपघात झालेल्या रुग्णांना अम्बुलंस मधून योग्य स्थळी वेळेत पोहोचू शकत नसल्याने त्याला आपला जीव गमवावा लागेल त्यांमुळे लोकांच्या जीवाशी खेळू नका हे पूल गुरुवार पर्यंत सुरु झाले नाही तर नाईलाजाने खुले करावे लागतील अशी तेथील अधिकाऱ्यांना तंबी दिली .त्यानंतर महापे अंडरपास ,तसेच सविता केमिकल्स येथील पुलाची पाहणी केली असता यांची कामे पूर्ण झालेले असल्याचे निर्दशनास आले .त्यावेळी अधिकार्यांनी वरिष्ठांना विचारून किरकोळ कामे पूर्ण करून लवकरात लवकर खुले करून देऊ असे आश्वासन खासदार विचारे यांना दिले.
खासदार राजन विचारे यांनी खासदार झाल्यानंतर दि. २९ जून २०१५ ला एम एम आर डी ए चे अतिरिक्त आयुक्त संजय सेठी यांच्या दालनात ठाणे बेलापूर मार्गावरील मंजूर झालेल्या पुलासंदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी हे पूल अतिआवश्यक असल्याने या पुलाच्या भूमिपूजनाची वाट न पाहता हे काम तत्काळ सुरु करुन घ्यावे तसेच या कामाचा वाहन चालकांना व तेथील स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन योग्य नियोजन करावे अश्या सूचना त्यावेळी अधिकाऱ्यांना करण्यात आल्या होत्या. मतदार संघात ये-जा करीत असताना या पुलाच्या बांधकामाची स्थिती वारंवार एम एम आर डी ए च्या अधिकाऱ्यांकडून घेत होते.सध्या मुंब्रा बायपास येथील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने येथील जड वाहने या ठाणे बेलापूर मार्गावरून वळविण्यात आली असल्याने येथील वाहनात भर पडून वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने याचा नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता खा. विचारे यांनी मा. मुख्यमंत्री यांना पत्र लिहून हे तयार झालेले उड्डाणपुल वाहनांकरिता खूले करण्यासाठी आपण तत्काळ वेळात वेळ काढून याचा उद्घाटन सोहळा पूर्ण करावा अशी विनंती या पत्राद्वारे केली आहे.