दीपक देशमुख
नवी मुंबई : ओकिनावा स्कुटर्स या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिकल दुचाकीच्या पहिल्या नवी मुंबईतील शोरूमचे उदघाटन कोपरखैरणे येथे नवी मुंबईचे शिल्पकार , लोकनेते माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी नगरसेविका वैशाली नाईक, नगरसेवक लीलाधर नाईक, स्वीकृत नगरसेवक घनश्याम मढवी, सावित्री महिला मंडळाच्या अध्यक्षा ललिता मढवी व सुलेखनाकार विलास समेळ आदी उपस्थित होते. हर्षल गायकवाड व आकाश फडतरे या दोन मराठी तरुणांनी कोपरखैरणे येथील कलश वैभव, सेक्टर १२ येथे इलेक्ट्रिकल स्कुटर्सचा नवी मुंबईतील पहिला शोरूम सुरू केला आहे.
या स्कुटर्समुळे ध्वनी,वायू प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाची होणारी हानी कमी होऊन इंधनाची बचत होईल म्हणून आम्ही इलेक्ट्रिकल स्कुटर्स शोरूम सुरू केला असल्याचे हर्षल गायकवाड यांनी सांगितले.