स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
* पाकिस्तानची साखर चालणार नाही…मनसे आक्रमक
* नवी मुंबई एपीएमसी व्यापार्यांना इशारा
*साखर घेणार नाही व्यापार्यांचे लेखी पत्र
* नवाज शरीफचे फोटो आणि पाकिस्तानी झेंडे जाळून निषेध
नवी मुंबई :- मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी रविवारी पाकिस्तानच्या एपीएमसी आवारातील साखर विक्रीबाबत नाराजी व संताप व्यक्त करण्याच्या घटनेला काही तास लोटले नाही तोच नवी मुंबई मनसेचा पाकच्या साखरविक्रीचा संताप बाजार समिती आवारात सोमवारी प्रत्यक्ष पहावयास मिळाला. चळवळ्या प्रवृत्तीच्या गजानन काळेंचा उक्तीवर नाही तर कृतीवर भर असतो हे पुन्हा नवी मुंबईकरांना एकवार जवळून पहावयास मिळाले.
मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील किराणा दुकान मार्केटमधील साखर व्यापार्यांना पाकिस्तानची आयात साखर विकत न घेण्याचे आणि कोणालाही न विकण्याचे लेखी इशारावजा पत्र दिले.
यावेळी मनसे पदाधिकार्यांनी व्यापार्यांना आपली देशभक्ती जागृत ठेवण्याचे व कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानची आयात साखर न विकण्याचे आवाहन केले अन्यथा मनसे कायदा हातात घेईल अशी तंबी देखील दिली. त्याच बरोबर मुंबई साखर असोसिएशन चे अध्यक्ष अशोक कुमार जैन यांना देखील मनसेने लेखी पत्र देऊन असोसिएशन ने आपल्या व्यापार्यांना पाकिस्तानी साखर न विकण्याचे लेखी निर्देश देण्याची मागणी केली. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ व सध्याचे पंतप्रधान शाहीद खाकन अब्बासी यांच्या छायाचित्रांची व पाकिस्तानी झेंड्यांची मनसेने यावेळी Aझचउ मध्ये होळी केली.
पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तानची साखर चालणार नाय चालणार नाय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो अशा घोषणा गेऊन Aएपीएमसी मार्केट परिसर मनसे कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. याउपरही मनसेची शोध मोहीम सुरु असून अशा पद्धतीने जर पाकिस्तानची साखर Aएपीएमसी मार्केटमध्ये आढळली तर त्या साखरेची व त्या गोदामाची होळी करू असा इशारा मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे.
पाकिस्तान मधून तब्बल ६० ते ६५ लाख मेट्रिक टन साखर नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मोदी-भाजप सरकारने आयात केल्याचे वृत्त आहे. राज्यात यंदाच्या हंगामात जवळपास ६० ते ६५ लाख मेट्रिक टना पेक्षा अधिक साखरेचे उत्पादन झाले असून मागच्या हंगामातील दोन ते अडीच लाख मेट्रिक टन साखर पडून आहे. अशा परिस्थितीत शत्रू राष्ट्र पाकिस्तान कडून ही साखर आयात करून महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदार यांच्या पाठीत मोदी-भाजप सरकारने खंजीर खुपसल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. सीमेवर जवान शहीद होत असताना शत्रू राष्ट्र पाकिस्तान मधून साखर आयात करणे म्हणजे त्या शहीद जवानांचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या त्यागाचा अवमान केल्यासारखे असल्याचे मनसेने म्हटले आहे. हे देशभक्त नाही तर देशद्रोही सरकार आहे. सर्जिकल स्ट्राइकवर आपली ५६ इंचाची छाती दाखवणारे पाकिस्तानची साखर आणताना कुठे गेले होते ? हेच का यांचे देशप्रेम अशा खोचक सवाल मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात केला आहे.
मनसे हा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाही. पाकिस्तानची साखर मनसे कोणत्याही परिस्थितीत या महाराष्ट्राच्या मातीत विकू देणार नसल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मनसेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुंबई साखर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कुमार जैन यांनी तात्काळ Aएपीएमसी व्यापार्यांना लेखी पत्र देऊन पाकिस्तानची साखर न विकण्याचे निर्देश दिले.
याप्रसंगी मनसेच्या आंदोलनात शहर अध्यक्ष गजानन काळे, महिला सेनेच्या प्रिया गोळे, चित्रपट सेनेचे श्रीकांत माने, विद्यार्थी सेनेचे संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, अभिजित देसाई, नितीन चव्हाण, नितीन खानविलकर, प्रवीण वाघमारे, प्रसाद घोरपडे, अमोल ऐवळे, श्याम ढमाले, अक्षय भोसले, अजय सुपेकर, विठ्ठल गावडे, आसिफ शेख, शरद दिघे, सागर मांडे, दत्ता तोडकर, राम पुजारे, रोहित गवस, अर्जुन देवेंद्र, विराट शृंगारे, भूषण बारवे व मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.