१३ हजार रुपयांची वेतनवृध्दी
नवी मुंबई :- वाडा एमआयडीसीमधील भुसारणे येथील मे गाला प्रेसिजन टेक्नॉलॉजी (हॉरबिगर) या कपंनीतील कामगारांसाठी लाकनेते गणेश नाईक यांनी स्थापन केलेल्या श्रमिक सेना युनियनने ऐतिहासिक पगारवाढीचा करार केला असून १३ हजार रुपयांची भरघोस वेतनवृध्दी कामगारांना मिळवून दिली आहे.
श्रमिक सेनेचे अध्यक्ष डॉ संजीव गणेश नाईक आणि सरचिटणीस चरण जाधव यांनी वेळोवेळी व्यवस्थापनाबरोबर बैठका घेवून कामगारांच्या हिताचा करार केला आहे.
जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२० या कालावधीसाठी हा करार अस्तित्वात राहणार आहे. जानेवारी २०१८ मध्ये ७८०० रुपये, जानेवारी २०१९मध्ये २६०० रुपये आणि जानेवारी २०२०मध्ये २६०० रुपये अशी एकून १३००० रुपये पगारवाढ देण्यात आलेली आहे. कामगाराच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती मरण पावल्यास त्या कामगारास तीन दिवसांची दुखवटा रजा भरपगारी मंजूर करण्यात आली आहे. कामगारांच्या अडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांच्या गरजा भागविण्यासाठी कंपनीत एक कामगार कल्याण सोसायटीची स्थापना करण्यात येणार असून या सोसायटीसाठी लागणारे सुरुवातीचे भांडवल कंपनी देणार आहे. त्याचबरोबर दिवाळी सणात एक भेटवस्तू देखील कंपनीच्या वतीने कामगारांना देण्यात येणार आहे. भरघोस पगारवाढीनंतर कामगारांनी उत्पादनवाढ अणि गुणवत्तेची हमी दिली आहे.
या पगारवाढीच्या करारावर कंपनीच्या वतीने व्यवस्थापकीय-संचालक संजय जोशी, व्यवस्थापक एच आर देशमुख, सहायक महाव्यवस्थापक संतोष देशमुख, श्रमिक सेना युुुनियनच्या वतीने अध्यक्ष डॉ. संजीव नाईक, सरचिटणीस चरण जाधव, कामगार प्रतिनिधी सुजाता पाटील, प्रविण नाईक, काळुराम सोनवणे, नितीन पाटील, पंकज पाटील, सचिन पष्टे, गणेश पाटील, उमेश अधिकारी, मयूर लबडे यांनी सहया केल्या. कंपनीचे कायदेशिर सल्लागार ऍड मोहित कपूर यांनी देखील सहकार्य केले.
चौकट..
श्रमिक सेनेचे धन्यवाद!
हॉरबिगर कंपनीतील श्रमिक सेनेच्या वतीने ऐतिहासिक पगारवाढ मिळवून देण्यात आली आहे. कामगारांना सरासरी २८ ते ४० हजार रुपये पगार मिळणार आहे. अशा प्रकारचा भरघोस पगार देणारी वाडा एमआयडीसीमधील ही एकमेव कंपनी आहे. या करारामुळे कपंनीतील कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून लोकनेते गणेश नाईक, श्रमिक सेनेचे अध्यक्ष डॉ.संजीव नाईक आणि श्रमिक सेनेला कामगार धन्यवाद देत आहेत.