— वाशीतील पालिका रुग्णालयात परिचारीका दिन साजरा
नवी मुंबई :- नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयामध्ये महिला परिचारीका रुग्णसेवेचे महत्वाचे काम करीत आहेत. रुग्णांची सेवा ही ईश्वर सेवा मानून रुग्णांना जीवनदान देणार्या परिचारीकांना भेडसाविणार्या समस्यांची सोडवणुक करण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन ऐरोली विधानसभा मतदार संघाचे आ.संदीप नाईक यांनी दिले.
जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून आदित्य हेल्थ ऍण्ड एज्युकेशन सोसायटीे आणि कोपरखैरणे ई प्रभाग समितीचे सदस्य डॉ.प्रतिक तांबे यांच्याच्यावतीने वाशी येथील नवी मुंबई महापालिका रुग्णालयात परिचारीकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आ.संदीप नाईक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाला नवी मुंबई महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जवांदे, कोपरखैरणे ई प्रभाग समितीचे सदस्य डॉ.प्रतिक तांबे, वाशी पालिका रुग्णालयाच्या प्रमुख अधिसेविका डॉ.स्नेहलता जाधव त्याच बरोबर इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आ.नाईक यांनी पालिका रुग्णालयात कार्यरत असणार्या परिचारीकांना दैनंदिन कामकाज करत असताना येणार्या अडचणी सोडविण्याबरोबरच पालिका रुग्णायात सुविधांनी परिपुर्ण असे कक्ष उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत. जनसेविकांचा गुलाब देऊन नवी मुंबईकरांच्यावतीने परिचारीका दिनी सत्कार केल्याचे म्हणाले.
कोपरखैरणे ई प्रभाग समितीचे सदस्य डॉ.प्रतिक तांबे यांनी जानेवारी १९७४ पासून दरवर्षी १२ मे हा दिवस (नर्सेस-डे) जागतिक परिचारीका दिन म्हणून साजरा केला जातो.परिचारीका हा आरोग्य सेवेचा कणा आहे. झपाटयाने विकसित होणार्या नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून स्थापन झालेल्या रुग्णालयात आणि इतर रुग्णालयात परिचारीका आणि डॉक्टर्स आरोग्य सेवेची कमान यशस्वीपणे सांभाळत आहेत. महापालिकेच्या माध्यामातून साकारलेल्या विविध रुग्णालयांमध्ये कार्यरत असणार्या डॉक्टर्स, परिचारिका व इतर कर्मचार्यांचे त्यांच्या सेवेबद्ल डॉ.तांबे यांनी कौतुक केले.
पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जवांदे यांनी देखील परिचारीकांच्या कामाचे कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.