स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांच्या संघटनेने घेतली भेट
पनवेल :- शेतकर्यांवर लादलेल्या नैना प्रकल्पाला मूठमाती देण्यासाठी प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या पदाधिकार्यांनी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची हॉटेल गार्डनच्या सभागृहात भेट घेवून चर्चा केली.
सिडको आणि राज्य शासनाने शेतकर्यांचे कंबरडे मोडून त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेली शेत जमिन फुकटात लाटत विकासाचे फसवे स्वप्न त्यांना दाखविले असल्याची माहिती कडू यांनी ठाकरे यांना दिले. त्याविषयी शेतकरी उत्कर्ष समिती आणि पनवेल संघर्ष समितीने दोन वेगवेगळे निवेदने देवून पनवेल तालुक्यातील 23 गावांतील नैनाबाधित शेतकर्यांच्या व्यथा त्यांच्या कानावर घातल्या.
आपण निवेदन वाचून पाहतो. त्यावर काही मार्ग काढता येतो का, याचा विचार करून आपणास कळवितो, असे राज ठाकरे यांनी शेतकर्यांच्या शिष्टमंडळाला आश्वासित केले.
तत्पूर्वी पत्रकारांशी झालेल्या संवादातून राज ठाकरे यांनी पनवेलच्या एकूणच नियोजनाच्या उडालेल्या फज्जावर खरमरीत शब्दात चर्चा केली.
शिष्टमंडळात कांतीलाल कडू, वामन शेळके, बाळाराम फडके, राज पाटील, अनिल ढवळे, रामचंद्र फुलोरे, डी. के. भोपी, नरेंद्र भोपी, मंगल भारवाड, लहू जळे आदींचा समावेश होता.
————————–
कांतीलाल कडू यांना दिली शाबासकी
राज ठाकरे यांचा आवडता विषय असलेल्या बेकायदेशिर झोपडपट्ट्या आणि परप्रांतियांच्या लोंढ्यांविषयी पत्रकार परिषदेनंतर कडू यांनी राज ठाकरे यांना, खांदा कॉलनीत असे दहशतवादी अड्ड्यास पुरक वातावरण तयार करणार्या झोपड्या पसरल्या होत्या, याची माहिती देत सिडकोविरोधी रणशिंग फुंकत आपण संघर्ष समितीच्या माध्यमातून साडेतीन हजारापेक्षा जास्त झोपड्या सिडकोला उद्ध्वस्त करण्यास प्रवृत्त केल्याची माहिती दिली. त्यावेळी ठाकरे यांनी शाबासकी देत कांतीलाल कडू यांचे कौतुक केले.