स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
* भाजप – शिवसेनेतील लाचारीच्या स्पर्धेवर विखे पाटील यांची मार्मिक टीका * पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ झंझावाती दौरा
मुंबई :- भाजप आणि शिवसेनेमध्ये स्वाभिमान शिल्लक राहिलेला नसून, एकमेकांवर जहाल टीका केल्यानंतरही दोघेही लाचारी पत्करून सरकारमध्ये टिकून आहेत. किंबहुना उभय पक्षांमध्ये ‘मेरी लाचारीसे तेरी लाचारी जादा कैसे?’ अशी रस्सीखेच सुरू झाल्याची मार्मिक टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील प्रचार दौ-यामध्ये त्यांनी ‘मेरे कमिजसे तेरी कमिज सफेद कैसे?’ अशी पंचलाईन असलेल्या एका साबणाच्या जुन्या जाहिरातीचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, त्या जाहिरातीमधील कपडे स्वच्छ धुण्याच्या स्पर्धेप्रमाणे भाजप आणि शिवसेनेत अधिकाधिक लाचारी पत्कण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. या दोन्हीही पक्षांना पुढील निवडणुकीत आता साबण लावूनच धुतले पाहिजे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार दामोदर शिंगडा यांच्या प्रचारासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पालघर जिल्ह्याचा झंझावाती दौरा केला. या दौ-यामध्ये त्यांनी जव्हार, डहाणू, नालासोपारा, वसई येथे प्रचार सभा घेत स्थानिक कार्यकर्ते व प्रमुख नेत्यांशीही संवाद साधला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री गणेश नाईक देखील त्यांच्या समवेत होते. उभय नेत्यांनी अत्यंत आक्रमकपणे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेवर टिकेची झोड उठविली. या प्रचार सभांना संबोधित करताना विखे पाटील यांनी भाजप, शिवसेना युतीच्या केंद्र व राज्य सरकारच्या लोकविरोधी कारभाराचा पंचनामा केला. २०१४ मध्ये भाजपने ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखविले होते. परंतू त्यांनी देशाची फसवणूक केली असून, लोकांच्या पदरी फक्त ‘झुठे दिन’ आले आहेत. या सरकारच्या कारभारावर समाजातील एकही घटक संतुष्ट नसून, शेतकरी, कामगार, व्यापारी, अं