दीपक देशमुख
नवी मुंबई :घनकचरा व्यवस्थापन मध्ये देशातून पहिला क्रमांक मनपाला मिळाला असतानाच स्वच्छता अभियान अंतर्गत सुरू केलेली स्वच्छतागृह बंद पडत आहेत.त्यामुळे असंख्य नागरिक रस्त्याच्या कडेला नैसर्गिक विधी करत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे बंद पडलेली शौचालय पुन्हा सुरू करावीत अशी मागणी नागरिक मोठ्या संख्येने करत आहेत.
सायन पनवेल महामार्गावर वाशी येथील उड्डाणपुलाची खाली मुंबईच्या दिशेने जाताना महिला व पुरुषा साठी दोन स्वच्छतागृह स्वच्छता अभियान अंतर्गत विनामूल्य सुरू केली होती.परंतु हीस्वच्छतागृह गेल्या दोन महिन्या पासून बंद अवस्थेत आहेत.तसेच यास्वच्छता गृहांचे दरवाजे लॉक केल्यामुळे उघडता येत नाही.त्यामुळे याठिकानाहून मुंबईच्या दिशेने जाणारे नागरिक रस्त्याच्या कडेलाच उघड्यावर नैसर्गिक विधी उरकत आसल्याचे नेत्र तज्ञ प्रशांत थोरात यांनी सांगितले.याठिकाणी नागरिकांची नेहमीच गर्दी असते.शेकडो नागरिक उघड्यावरच नैसर्गिकविधी उरकत असल्यामुळे दुर्गंधी पसरली असल्याचेही डॉ.थोरात यांनी सांगितले.
अशीच परिस्थिती पूर्ण मनपाच्या हद्दीतील दिघा,ऐरोली,घणसोली,कोपरखैरणे,वाशी, तुर्भे,नेरुळ व बेलापूर परिसरातील नव्याने बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची आसल्याचे वास्तव आहे.काही स्वच्छतागृहात विद्युत दिवे बंद आसने,पाणी नसणे,अस्वच्छता असणे आश्याप्रकाराच्या समस्या यास्वच्छतागृहात आसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
हागणदारीमुक्त मनपा परिसर करणे हे ध्येय होते.परंतु जशी स्वच्छता मोहीम संपली तशी यास्वच्छतागृह कडे असलेले मनपा आधिकाऱ्यांचे लक्ष दुर्लक्षित झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे कोट्यवधी रुपये स्वच्छतागृहावर करूनही काहीही फायदा होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.जर विनामूल्य स्वच्छतागृह मनपाला देने जमत नसेल तर दर आकारून नागरिकांना सुसज्ज स्वच्छतागृह द्यावेत अशीही मागणी नागरिक करत आहेत.
याबाबत मनपाचे उपायुक्त तुषार पवार यांच्याशी संपर्क साधला असता,याबाबत चौकशी करून कारवाई करतो असे सांगितले.