आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून डिजिटल क्लासरूम व मिनी सायन्स सेंटर होणार उपलब्ध
नवी मुंबई :- नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिकदृष्ट्या विकास व्हावा तसेच विद्यार्थ्यांना सायन्स विषयाची गोडी लागून विद्यार्थ्यांचा कल जास्तीत जास्त सायन्स विषयाकडे व्हावा, याकरिता शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम व मिनी सायन्स सेंटर उपलब्ध करणेकरिता बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधी मधून निधी उपलब्ध केला आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकांच्या शाळा आता हायटेक होणार असून विद्यार्थीही हायटेक होणार असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, नवी मुंबईतील महानगरपालिकांच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिकदृष्ट्या विकास व्हावा तसेच विद्यार्थ्यांना सायन्स विषयाची गोडी लागून विद्यार्थ्यांचा कल जास्तीत जास्त सायन्स विषयाकडे व्हावा, याकरिता शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम व्हावे तसेच सायन्स सेंटर उपलब्ध करता येऊ शकेल त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होऊन महापालिकांच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्याचा कल वाढत जाईल. शाळा तर हायटेक होणारच आहेत, परंतु त्यामुळे विद्यार्थीही हायटेक होणार आहेत. सदर डिजिटल क्लासरूम व मिनी सायन्स सेंटर करिता माझ्या आमदार निधीमधून निधी उपलब्ध करताना मला समाधान वाटत असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.