पनवेल :- पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादन करीत बाजी मारली आहे. विशेषतत्त्वाने अनेक वर्षांपासून शेकापक्षाच्या ताब्यातील ग्रामपंचायत भाजप व मित्र पक्षाच्या शिलेदारांनी काबीज करत या निवडणुकीत शेकापच्या बालेकिल्ल्यांना खिंडार पाडली असून हातातील ग्रामपंचायती गेल्यामुळे शेकापक्ष सातत्याने बॅकफूटवर गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुका जिंकत भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले. आजपर्यत गुळसुंदे, कोन, चिखले, दुंदरे ग्रामपंचायतीत शेकापची सत्ता होती. गुळसुंदे ग्रामपंचायतीत भाजपचे हरिचंद्र लक्ष्मण बांडे सरपंच, कोन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निलेश नथुराम म्हात्रे, चिखले ग्रामपंचायतीत नामदेव माया पाटील, दुंदरे ग्रामपंचायतीत अनुसया विष्णू कातकरी, मालडुंगे ग्रामपंचायतीत हर्षदा सोमनाथ चौधरी सरपंच म्हणून भरघोस मतांनी विजय झाले असून न्हावे ग्रामपंचायतीत आघाडीचे जितेंद्र म्हात्रे, ओवळे ग्रामपंचायतीत ग्राम विकास आघाडीच्या रेश्मा अमित मुंगाजी विजयी झाले.
गुळसुंदे, चिखले, कोन, दुंदरे या ग्रामपंचायतीत शेकापची सत्ता अबाधित होती, या ठिकाणी भाजपने बाजी मारत विरोधकांना पराभवाची धूळ चारली. गुळसुंदे ग्रामपंचायतीत नुतन रमाकांत पाटील, मारुती काशिनाथ माठळ, मनोज वसंत पवार, प्रभावती प्रभाकर कार्लेकर, पल्लवी नरेश ठाकूर, चिखले ग्रामपंचायतीत रमेश गणा गडकरी, रवींद्र बबन गडकरी, विनायक रमेश पाटील, सुरेखा योगेश पाटील, दुंदरे ग्रामपंचायतीत रमेश सिताराम पाटील, भारत सुभाष भोपी, निराबाई शांताराम चौधरी, किशोर आत्माराम पाटील, मंगला गणेश उसाटकर, दर्शना नारायण चौधरी, मालडुंगे ग्रामपंचायतीत राजू काळूराम वाघ, रंजना दशरथ पारधी, अलका पांडुरंग खंडवी, तनुजा पदू दोरे, जनार्दन नाग्या निरगुडा, कोन ग्रामपंचायतीत सुलोचना ज्ञानेश्वर भागीत (बिनविरोध), महेश जोमा माळी (बिनविरोध), घनश्याम महादेव पाटील, न्हावे ग्रामपंचायतीत प्रल्हाद बाळाराम पाटील, किसन गोवर्धन पाटील, अमृता विशाल पाटील, हरिचंद्र बाळाराम म्हात्रे, कल्पना महेंद्र घरत, सागर काना ठाकूर, मंजुषा गोपीचंद ठाकूर, कसळखंड ग्रामपंचायतीत महेंद्र अनंता गोजे, निवेदिता नितीन लबडे, लता अनंता पाटील, दापोली ग्रामपंचायतीत अमोल रमेश गव्हाणकर, लक्ष्मी रामचंद्र गोसावी(बिनविरोध), निवडून आले. वावेघर ग्रामपंचायतीत भाजप आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले मात्र थोडक्यात सरपंचपदाने हुलकावणी दिली. येथे विलास हसुराम माळी, श्रुती ज्ञानेश्वर माळी, मनस्वी मनोज पवार, जगन्नाथ रामू चव्हाण, मनिषा मनोहर जाधव, अशोक दत्तू गायकर, संध्या महादेव कांबळे, दीपक दत्तात्रेय बरवी (बिनविरोध), विजयी झाले.
यावेळी नवनिर्वाचित सर्व सरपंच व सदस्यांचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, नगरसेवक मनोहर म्हात्रे, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर,
जिल्हा परिषद सदस्या रेश्मा शेळके, रवींद्र खानावकर, लीना पाटील, अनेश ढवळे, अशोक साळुंखे, यांच्यासह कार्यकर्त्यानी अभिनंदन केले.