दिपक देशमुख
नवी मुंबई : ऐरोली सेक्टर सहा येथील चौकात सेक्टर पाचच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्या लगत रिक्षा चालक आपली रिक्षा उभ्या करत असल्याने येथे रोज सकाळी व संध्याकाळी वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे.त्यामुळे यारीक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी समाजसेवक लहानु ननावरे यांनी केली आहे.
ऐरोली सेक्टर 5 व 6 याठिकाणी एक चौक आहे.याठिकानाहून वाहन ऐरोली सेक्टर 5,4,3,2 व 1,रबाले ,ठाणे,मुलुंड व बेलपुरच्या दिशेने जातात.याचौकात नेहमीच वाहनांची गर्दी नेहमीच गर्दी असते.वाहतुकीचा प्रश्न येथे नेहमीच येथे निर्माण होत असताना रिक्षा चालकांच्या बेपर्वाई मुळे त्यामध्ये अजूनच भर पडल्याचे नागरिक सांगतात.
यारीक्षा बिनधास्तपणे ऐरोली सेक्टर पाचच्या बाजूला जाणाऱ्या रस्त्यावर नियंबाह्यपणे उभ्या राहत असल्यामुळे बेलापूर,रबाले व मुलुंडच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना याचा मोठा त्रास होत असल्याचे चालक धोंडूराम सूर्यवंशी यांनी सांगितले.
याबाबत समाजसेवक लहानु ननावरे यांनी अनेकदा वाहतूक शाखा रबाले विभागाला माहिती दिली आहे.परंतु येथील वाहतुक पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे ननावरे यांनी सांगितले.तसेच येथेच पेट्रोल पंप आहे.त्याठिकाणी इंधन भरण्यासाठी येणारी वाहनेही रस्त्यावरच रांगेत उभी राहत असल्यामुळेही वाहतुकीचा प्रश्न मोठा होत असल्याचेही ननावरे यांनी सांगितले.
याबाबत रबाले वाहतूक विभागाच्या निरीक्षक ममता डिसुझा यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.