दिपक देशमुख
नवी मुंबई: मनपा परिवहन विभागाच्या घणसोली आगारच्या बसेसची नियमित तपासणी व दुरुस्ती नियमित होत नसल्याने नेहमीच रस्त्यावरच बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत.त्यामुळें प्रवाशी कंटाळले आहेत.बसेस योग्य प्रकारे धवाव्यात म्हणून खुद्द आयुक्तांची परिवहन कडे लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निखिल म्हात्रे यांनी केली आहे.
घणसोली आगारात एकूण 114 बसेस सध्या उपलब्ध आहेत.विशेष ह्या सर्व बसेस नवीन आहेत.या आगारचा ठेका श्री महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट कडे आहे.परंतु ज्या ठेकेदाराला हा आगार दिला आहे त्याचा बस दुरुस्तीसबंधी पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने अनेकदा बस मध्येच बंद पडणे,धक्का मारून सुरू करणे असे प्रकार नियमित होत असल्याचे निखिल म्हात्रे यांनी सांगितले.
जेएमएमआरडीये या योजने अंतर्गत 114 मिनी,मिडी,मोठ्या बसेस व वातानुकूलित बसेस घणसोली आगारात आहेत.मागील दोन वर्ष्यापूर्वी पासून याबसेस नागरिकांना सेवेसाठी दिल्या आहेत.पूर्णपणे नवीन बसेस येथे दिल्या असल्या तरी ठेकेदारचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याने बसेस मध्येच नादुरुस्त होत असल्याचे दिसून येत आहे.परिवहन प्रशासन झोपेचे सोंग घेऊन ठेकेदाराला सहकार्य करत आसले तरी आयुक्तांनी डोळे झाक करू नये अशी अपेक्षा निखिल म्हात्रे यांनी केली आहे.त्यामुळें आयुक्तांनी श्री महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट ठेकेदाराला परिवहन विभागातून हकळावे अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.
याबाबत परिवन सभापती प्रदीप गवस यांना विचारले असता ,या ठेकेदारा बाबत विचार करायची वेळ आली आहे असे सूचक सांगितले.