-राष्ट्रवादीतर्फे नवी मुंबईकरांडून सत्कार
नवी मुंबई :- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा आज मंगळवारी (ता.२९) निकाल जाहिर झाला. सीबीएसई १० वीचा एकूण निकाल ८६.७० टक्के लागला आहे. सीबीएसईच्या परीक्षेत महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी चमकले आहेत. त्यात नवी मुंबईतील नेरुळ-सीवूडस येथील डी.पी.एस शाळेचा विद्यार्थी अखिलेश नारायण हा ९९ टक्के गुण मिळवून महाराष्ट्रातून प्रथम आला आहे. त्याच्या या यशाबद्ल राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक यांनी त्याच्या घरी जाऊन त्याला नवी मुंबईकरांच्यावतीने तसेच राष्ट्रवादीतर्फे त्याच्या यशाबद्ल शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादीच्यावतीने सत्कार करताना नवी मुंबईतील महापालिकेतील सभागृह नेते रविंद्र इथापे, क्रिडा व सांस्कृतिक समितीचे सभापती विशाल डोळस, माजी नगरसेवक राजू शिंदे त्याच बरोबर अखिलेशचे आई-वडील उपस्थित होते.
देशभरात ८८.६७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर ८५.३२ टक्के मुले देशात उत्तीर्ण झाली आहेत. म्हणजेच यंदा या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. देशभरातून यावर्षी एकूण १६ लाख २४ हजार ६८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ लाख ८ हजार ५९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.