नवी मुंबई :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ पश्चिममधील सामाजिक कार्याचा वसा जोपासत नावारूपाला आलेले मातब्बर कार्यकर्ते रवींद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त नेरूळ सेक्टर १६ परिसरात आयोजित करण्यात आलेले विविध सामाजिक कार्यक्रम उत्साहात साजरे झाले.
रवींद्र भगत हे सामाजिक संवेदना असलेले व्यक्तीमत्त्व म्हणून नेरूळ पश्चिमेला परिचित आहे. वृक्षांमध्ये, तारेमध्ये अडकलेल्या पक्ष्यांची सुटका करणे, सार्वजनिक ठिकाणी तसेच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आढळलेल्या नाग-साप यांना पकडून जंगलात सोडणे, पर्यावरणाची छायाचित्रे काढणे, विविध नागरी व सामाजिक समस्या निवारणांकरिता पालिका दरबारी पाठपुरावा करणे अशा विविध स्वरूपात सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात रवींद्र भगत यांचे मोलाचे योगदान आहे.
रवींद्र भगत हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात कार्यरत असलेे तरी जनसामान्यांमध्ये ते एक हाडामासाचा सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच परिचित आहेत. त्यांचा वाढदिवस १ जूनला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्र्रेसच्या कार्यकर्त्यांनी व त्रिमूर्तीवर प्रेम करणार्या स्थानिक रहीवाशांनी वाढदिवसाच्या अगोदरच एक दिवस नेरूळ सेक्टर १६ परिसरात विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करत एक दिवस अगोदरच वाढदिवस उत्साहात साजरा केला. गुरूवारी सकाळी नेरूळ सेक्टर १६ परिसरातील महापालिकेच्या संभाजी उद्यानात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर एमएसईडीसीच्या आवारात उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्टट्ट्याचेही यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याच कार्यक्रमात पावसाळा तोंडावर आलेला पाहून विभागातील ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपही करण्यात आले.
या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेरूळ पश्चिम तालुकाध्यक्ष गणेशदादा भगत, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत, अँड. हनुमंत वाक्षे, समाजसेवक संजय पाथरे, भोजमल पाटील, अहमद सय्यद, आनंद पवार, विष्णू वाडकर, पांडुरंग बेलापूरकर, दादा पवार, अशोक पिंगळे, किरण पवार, अशोक गांडाल, सतीश जगदाळे, लक्ष्मण कणसे, बाजीराव धुमाळ, गणेश धांद्रुत, सुरेश ठाकूर, प्रदीप कलशेट्टी, सतू गवस, राकेश तांडेल, दिनकर फडतरे, भागोजी घाडगे, रमेश नार्वेकर, अनंत कदम, चेतन खांडे, मन्सूर कोतवडेकर, रोहित चव्हाण, सूर्या पात्रा, राजेश घाडी, ओमप्रकाश सिंग, रोहित दाते, पवन पवार, सुरेंद्र गायकवाड, सुरेश अप्पनकर, समीर कांबळे, संतोष पावसकर, उत्तम ढसाळ, उत्तम कांबळे, अशोक कांबळे, गोरखनाथ सोरटे, रमेश गायकवाड, बबन लोंढे, कांबळे फौजी, लगाडे, शेंडे, दिंगबर गिरी, अमर मोरे, विनीत गिरी, समाजसेविका सौ.प्राजक्ता प्रभू, विमल गांडाल, सुरेखा देठे, फडतरे, हिराबाई सरवदे, संगीता शिंदे, छाया चव्हाण यासह परिसरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी, रहीवाशी, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्गासह युवकांची उपस्थिती लक्षणीय स्वरूपात पहावयास मिळाली.