उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते गौरव
नवी मुंबई :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या (एचएससी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून नेरूळसिवूडस सेक्टर ४८ येथील गौरव महाविद्यालयाचा बारावीचा निकाल हा ९९ टक्के लागला आहे. यामुळे शिक्षक वृंद, विद्यार्थी तसेच पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. गौरव महाविद्यालयामध्ये इयत्ता बारावी सायन्स शाखेतील सक्षम सुद याने ८९.००% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला असून फतिमा चौघुले हिने वाणिज्य शाखेत ७९.०७% गुण प्राप्त करून महाविद्यालयामध्ये प्रथम क्रमांक पटकाविले. देवांश खरे ८१.००% शिकर निरंजन, ७८.७६%, अमिना हुसैन ७८.३०%, चैत्राली भुर्के ७५.२३%, रिंकज के. मिश्रा ७६.६१% या विद्यार्थ्यांनी उत्तम गुण संपादन केले असून बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताईम्हात्रे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौवरविण्यात आले व उर्त्तीण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे पुढे म्हणाल्या की, १० वी व १२ वी नंतर पुढे काय ? हा प्रश्न खरंतर आज सर्वच पालकांना व विद्यार्थ्यांना पडलेला असतो. जो तो आपआपल्या परीनेउत्तरं शोधत असतो, बहुतेकदा शेजारी-पाजारी नातेवाइक फार फार तर एखादे वर्तमानपत्र ह्यांची मद्त सामान्य पालक व विद्यार्थी घेतात. करीअरची दिशा ठरवण्याचा योग्य काळकुठला ? करीयरची दिशा दहावी-बारावी नंतरच ठरवली पाहिजे. आयुष्यातील दहावी-बारावीचे वर्ष खूप महत्त्वाचे मानले जाते. चांगल्या करीयरची दिशा दहावी-बारावीनंतरच ठरवावी.ज्या प्रमाणे कोणत्याही गोष्टीचे नियोजन केल्याने ती गोष्ट जरी कमी असली तरी पुरते हा आपल्या रोजच्या जीवनातील अनुभव असतो, तसेच करीयरचे नियोजन केल्याने सामान्यबुद्धिमत्तेचे विद्यार्थीही उच्च स्थानी पोहचू शकतात. तसेच कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा हे कसे ठरवावे हे ही पालकांनी व विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. दहावीनंतरविद्यार्थ्याला विविध अभ्यास शाखा उपलब्ध असतात. बर्याचदा गुण चांगले असतात, मात्र कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा? हा प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही पडतो. सगळ्यात आधी विद्यार्थ्याचा स्वतःचा कल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्याला कुठल्या विषयात करीयर करायचे आहे, हे समजून घेतले पाहिजे. मग त्याविषयीचाविचार करा. त्या दिशेला नोकरीच्या संधी किती उपलब्ध आहेत? त्याचे मन त्या विषयात रमेल काय? याबाबत त्याला सविस्तर मार्गदर्शन केले पाहिजे. त्याचवेळी त्याची त्या विषयातली अभिरूची, योग्यता व क्षमता पाहणेही महत्त्वाचे आहे. पालकवर्ग विद्यार्थ्यांमधील क्षमता न बघता,त्याच्या इच्छेचा कुठलाही विचार न करतात्याला त्याच्या मनाविरूध्द शाखेकडे ढकलतात. मुळातच त्याच्या दृष्टीने चुकीचा विषय निवडला जातो. त्यात विशेष प्राविण्य मिळवता न आल्याने त्याच्यात वैफल्य निर्माणहोते व तो करीयरच्या पहिल्या पायरीवर डगमगतो.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी उर्त्तीण झालेल्या विद्यार्थ्याचे तसेच त्यांचे पालक व महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. जकारिया सर यांचेही अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.