राज ठाकरे यांच्या जन्मदिनी नवी मुंबईत सामाजिक उपक्रमांचे आयोजन
नवी मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई मनसे तर्फे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण नवी मुंबईत विविध विभागांमध्ये सकाळ पासून वृक्षरोपण, स्वस्त दरात पेट्रोल, सफाई कामगारांचा सत्कार, रक्तदान शिबीर, दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आरोग्य तपासणी शिबीर, नागरिकांसाठी वॉर्ड कार्यालयात तक्रार पेटीचे अनावरण, नागरिकांसाठी सूचना फलकाचे अनावरण या व असे अनेक उपक्रम नवी मुंबईतील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राबविले.
सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत नेरूळ येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर सर्व दुचाकीस्वारांसाठी ४ रु. स्वस्त दराने पेट्रोल मनसेच्या नेरूळ, सीवूड्स व बेलापूर विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात आले होते. यावेळी शेकडो दुचाकीस्वारांनी या उपक्रमाचा लाभ घेतल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मनसेच्या कोपरखैरणे विभागातर्फे सकाळी सात वाजता मनपा सफाई कामगारांचा त्यांच्या कार्यासाठी प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कोपरखैरणे विभागातार्गे सकाळी १० ते ५ ये वेळेत रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. तर मनसेच्या नेरूळ विभागा तर्फे वॉर्ड ऑफिसमध्ये नागरिकांसाठी तक्रार पेटीचे अनावरण करण्यात आले व त्या नंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम डी.वाय.पाटील कॉलेज समोरील मोकळ्या जागेत करण्यात आला. ऐरोली सेक्टर-४ येथे संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मनसेच्या ऐरोली विभागा तर्फे करण्यात आले होते तसेच दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. कोपरखैरणे येथे मनसे तर्फे नागरिकांसाठी सूचना फलकाचे अनावरण करण्यात आले.
या सर्व सामाजिक उपक्रमांचे आयोजन शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, शहर सचिव संदीप गलुगडे, अप्पासाहेब कोठुळे, अभिजीत देसाई, अमोल आयवळे, डॉ.आरती धुमाळ, श्रीकांत माने, सविनय म्हात्रे, नितीन खानविलकर, संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, प्रसाद घोरपडे, निखील गावडे, विश्वनाथ दळवी, संतोष जाधव, संजय सुतार, रुपेश कदम, शरद डीगे, विनय कांबळे, नितीन नाईक, भालचंद्र माने, सचिन कदम, दत्तात्रय तोडकर, सुधीर पाटील, सुहास मिंडे, विशाल भिलारे, महेश कदम, सागर मांडे, निखील थोरात, मनिषसिंग राजपूत, चंद्रकांत डांगे, घनश्याम चौधरी, उमेश म्हानवर, शशिकांत साळुंखे, सखराम संकपाळ, तुषार कचरे, विराट शृंगारे, देवा प्रसाद, विनायक पिंगळे व नवी मुंबई मनसैनिकांनी केले होते.