दीपक देशमुख
नवी मुंबई : महापालिका आयुक्त एन.रामस्वामी यांनी डेब्रिज विरोधी पथकातील तेरा अधिकारी व कर्मचार्यांना नोटीस देऊन दोन महिने पूर्ण होण्यास आले तरी त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.त्यामुळे आयुक्तांनी दिलेल्या नोटीस ह्या नाटक होते की काय अशी शंका घेतली जात आहे.त्यामुळे आयुक्तांनी दिलेल्या नोटिसा संबंधी योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे.
मनपा हद्दीत दिवसेंदिवस डेब्रिजचा अनधिकृत डोंगर उभे राहिले होते.याबाबत तक्रारी तसेच विविध वर्तमान पत्रात बातम्या आल्या म्हणून आयुक्तांनी डेब्रिज विरोधी पथकातील आठ पथक प्रमुख,दोन नियंत्रण अधिकारी व तीन विभाग अधिकारी कार्यालयाचे सहाययक आयुक्तांना डेब्रिज विरोधी कणखर भूमिका घेतली नाही म्हणून २३ एप्रिल ला नोटिसा दिल्या गेल्या होत्या.
२३ एप्रिल रोजी नोटीस दिल्यानंतर आजतागायत ५० दिवस पूर्णत्वास होत आले तरी तरी त्यावर प्रशासन कोणतीही कार्यवाही करत नसल्याने ह्या तेरा अधिकार्यांना व कर्मचार्यांना वाचवायचा डाव चाललंय की काय अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत.त्यामुळे नोटिशीच्या अनुषंगाने योग्य तो निर्णय घेण्याची गरज भासू लागली आहे, अशाा प्रकारचा नागरिकांकडून मत प्रवाह व्यक्त होत आहे.
मनपाच्या इतिहासात तेरा जणांना प्रथमच नोटीस दिल्या गेल्या होत्या.त्यामुले मनपा कर्मचार्या मध्ये धगधग निर्माण झाली होती. परंतु त्या नोटिशिवर कोणत्याही प्रकारचा निर्णय होत नसल्याने या नोटिसीना केराची टोपली तर दाखवली गेली नाहीना व आयुक्तावर डेब्रिज माफियांचा दबाव तर आला नाहीना अश्या प्रकारचा संशयही व्यक्त होत आहे.
याबाबत अतिरिक्त आयुक्त रामेश चव्हाण यांना विचारले असता,घनकचरा विभागा कडून माहिती घेऊन कार्यवाही करतो असे सांगितले.