नवी मुंबई : अभंग आणि कवितांच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि समर्थ रामदासांसारख्या प्रसिध्द संतांनी मांडलेले जीवनाचे सार संतांनी आपल्या किर्तन, प्रवचन आणि साहित्यातून मांडले आहेत. आजही आयुष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी मन:शांतीचा शोध घेणार्यांसाठी हे साहित्य म्हणजे दीपस्तंभच ठरला आहे. संताची शिकवण जपणारा ’बोलावा विठ्ठल’ हा संत साहित्याने नटलेला कार्यक्रम आहे. दोन दशकांहून अधिक काळ पंचम निषादतर्फे भारतातील या जगविख्यात अप्रतिम लोककलेवर भर दिला जात आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भक्तीसंगीताचा सहाबहार कार्यक्रम बोलावा विठ्ठल १२ शहरांमध्ये अखंडीतपणे १३ व्या वर्षी साजरा होत आहे नवी मुंबईतही हा कार्यक्रम येत्या २२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता वाशीतील सिडको आर्ट्स आणि एक्झिबिशन सेंटर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पंचम निषादचे क्रिएटिव्ह्स संचालक शशी व्यास म्हणाले की, भारतीय भक्तीसंगीताचे ढोबळमानाने दोन भाग केले जातात, सगूण (फॉर्मसहित) आणि निगुर्ण (फॉर्म नसलेला आणि स्वच्छंद). अभंग हा दोन्हीचा उत्तम मिलाफ आहे. नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर, बहिणाबाई यासारख्या अनेक संतांनी मांडलेले आयुष्याचे सार सांगणारे भारतीय तत्वज्ञान आणि समृध्द सांस्कृतिक वारसा तरुण पिढीपर्यंत नेण्याचा एक प्रयत्न केला आहे.
यंदा हा दौरा १२ शहरांमध्ये असणार आहे. भोपाळमध्ये आज १४ जुलैपासून सुरुवात झाली असून त्यानंतर इंदूर, अहमदाबाद, बेंगळुरु, चेन्नई, मंगलोर नंतर नवी मुंबई, ठाण्यात होणार आहे. तर ५ ऑगस्ट रोजी हैद्राबाद येथे याची सांगता होईल. नवी मुंबईकरांना अशा प्रकारचा अनेक आवाजांना सुमधुर स्वरांनी जोडणारा मुंजमयी कार्यक्रम अनुभवायची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमात कर्नाटकी तसेच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील अतिशय प्रतिभावान आणि प्रसिद्ध गायकांचा समावेश आहे. यात सुरेश वाडकर, अरुणा साईराम, देवकी पंडित, रंजनी-गायत्री, कौशिकी चक्रवर्ती, जयतीर्थ मेवुंडी. आनंद भाटे, राहुल देशपांडे, रघुनंदन पणशीकर आणि अर्पणा केळकर यांचा समावेश असणार आहे. अधिक माहितीसाठी ुुु.रिपलहरापळीहरव.लेा इथे लॉग ऑन करा किंवा अधिक माहितीसाठी ७०४५५९७५०१ येथे संपर्क साधावा.