नवी मुंबई:- नवी मुंबईमधील सिडकोचे निवासी व अनिवासी भूखंड फ्री होल्ड होत असतांना सामाजिक सेवेसाठी देण्यात आलेले शाळा, कॉलेज, समाज मंदिरे अशा भूखंडांना वापरात बदल (उहरपसश ेष र्ीीश) न करता सदरचे भूखंडही फ्री होल्ड व्हावे यासाठी नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात नवी मुंबईतील शाळांच्या मुख्याध्यापक व प्राचार्य, सभासद यांच्या शिष्टमंडळासह आ. मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात नुकतीच बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, नवी मुंबई भाजपा महामंत्री निलेश म्हात्रे, उपाध्यक्ष अब्दुल हमीद खान, फादर अलमेडा, फादर अब्राहम जोसेफ, फादर हेन्री डिसुझा, के. थॉमस, जे. मोहंती, संतोष सावंत, निशीत विजयन, विजय गोटमरे, शशी टेंभूरने उपस्थित होते.
यावेळी आ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबईतील सर्व शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्यांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेऊन सदरबाबतच्या मागणीचे निवेदन मला दिले होते. या अनुषंगाने पावसाळी अधिवेशनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांजसह नियोजित बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत माझ्या नेतृत्वाखाली फादर अब्राहम जोसेफ, फादर अलमेडा व फादर हेन्री डिसुझा यांनी त्यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने सदर विषयाबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. नवी मुंबई मधील सिडको अखत्यारीतील इमारती फ्री होल्ड व इमारतींचा पुनर्विकास संदर्भातील विषय अंतिम टप्प्यात आहे. सिडको महामंडळाने नवी मुंबईमध्ये सामाजिक सेवेसाठी शैक्षणिक क्षेत्राकरिता व समाज कल्याणासाठी ज्या संस्थांना भूखंड देण्यात आलेले आहेत त्या भूखंडावर उत्कृष्ट दर्जाची शाळा, महाविद्यालये, समाजमंदिरे कार्यरत आहेत. सिडको महामंडळाने सामाजिक सेवेसाठी देण्यात आलेले सदरचे भूखंडही फ्री होल्ड केल्यास नवी मुंबईच्या विकासात अजून भर पडेल. तसेच सदरबाबत निर्णय घेताना सामाजिक सेवेसाठी दिल्या गेलेल्या भूखंडांना वापरात बदल (लहरपसश ेष र्ीीश) न करण्याची अट घालून सदरचे भूखंड फ्री होल्ड करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे, असे झाल्यास देण्यात आलेल्या सामाजिक सेवेच्या भूखंडाचाही पुनर्विकास होईल व सदर सेवासंस्था नागरिकांना सेवा सुविधा प्राप्त करण्यास अधिक कार्यक्षम होतील. सदर बैठकीत शाळांबाबत विविध विषयांवर चर्चा झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सदरबाबत सकारात्मक असल्याचे सांगितल्याने सर्व शाळांतील मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी आनंद व्यक्त केला आहे.