येत्या 17 आणि 18 ऑगस्टपासून ऑडिशन्स सुरू होणार
पनवेल : नवोदितांच्या कलेला सशक्त मंच देत त्यांच्यातील कलागुणांची उधळण करण्यासाठी प्रोत्साहन देणार्या शिर्के डेकोरेटर्स अँड इव्हेंट तर्फे पनवेलमधल्या महिला आणि मुलींसाठी मिस अँड मिसेस पनवेल 2018 ही सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. नुकतंच पनवेलच्या हॉटेल वीर रेसिडेन्सी इथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
नवोदितांच्या कौशल्याला योग्य ते व्यासपीठ मिळवून देत त्यांच्याकडून नव आविष्काराची निर्मिती व्हावी या उद्देशाने शिर्के डेकोरेटर्स अँड इव्हेंटचे भूषण शिर्के आणि ऋषी धुमे यांनी मिस अँड मिसेस पनवेल 2018 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. केवळ सौंदर्य हा निकष न ठेवता स्पर्धकांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न या सौंदर्य स्पर्धेतून केला जाणार असल्याचे भूषण शिर्के यांनी सांगितलं, या स्पर्धेसाठी पनवेलमधून जवळपास 300 स्पर्धक सहभागी होणार आहेत. येत्या 17 आणि 18 ऑगस्टपासून मिस अँड मिसेस पनवेलसाठी ऑडिशन्स सुरू होणार आहेत. त्यातल्या एकूण 40 मुली आणि 40 महिला स्पर्धकांची निवड पूर्व प्राथमिक फेरीसाठी करण्यात येणार आहे. त्यानंतर 20 मिस पनवेल अँड 20 मिसेस पनवेल ची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येणार आहे.
वीर रेसिडेन्सी हॉटेलच्या सभागृहात सेमी फायनल तर काकाजीनीवाडी इथे अंतिम फेरी रंगणार असून या स्पर्धेतल्या विजेत्यांना खास पारितोषिक म्हणून एका आगामी मराठी अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी रोख रकमेचं बक्षीसही यावेळी ठेवण्यात आलं आहे.
या स्पर्धेच्या आयोजनामागचा उद्देश स्पष्ट करताना शिर्के डेकोरेटर्स अँड इव्हेंटचे ऋषी धुमे सांगतात की, योग्य संधी मिळाली तर नवीन कलाकारही यशस्वी चित्रपट देऊ शकतात. या हेतूनेच आम्ही ही स्पर्धा आयोजित केली. स्पर्धेच्या माध्यमातून मराठी अल्बममध्ये उदयोन्मुख चेहऱ्यांना संधी देण्याची ही अनोखी संकल्पना निश्चितच आगळी असेल असा विश्वासही ते व्यक्त करतात. सौंदर्य स्पर्धा या मुंबई -पुण्यासारख्या मोठं मोठ्या शहरात होत असतात. मात्र पनवेलमध्येही सुंदर युवती आणि महिला आहेत. शिर्के डेकोरेटर्स अँड इव्हेंटने मिस अँड मिसेस पनवेल 2018 चे आयोजन करून पनवेलमधल्या मुली आणि महिलांसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. त्यामुळे पनवेल मधल्या जास्तीत जास्त महिला आणि मुलींनी या सौंदर्य स्पर्धेत सहभागी, असं आवाहन शिर्के डेकोरेटर्स अँड इव्हेंटचे भूषण शिर्के आणि ऋषी धुमे यांनी केलं आहे. इच्छुक युवती आणि महिलांनी 9820331838 आणि 8767921437 या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं .