अमोल इंगळे
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात जाणता राजा तरूण मित्र मंडळाने स्वातंत्र्यदिनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त नेरुळ सेक्टर ६ येथील आश्रम कंत दर्शन दरबार येथे जाणता राजा तरुण मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात या शिबिरास विभागातील सर्व नागरिक, युवक, आणि समाजसेवक यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. मंडळाने पहिल्यांदाच आयोजित केलल्या या रक्तदान शिबिरास मोठया प्रमाणात प्रतिसाद लाभला. स्वातंत्र्य दिनानिमित्त या शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले .
या कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व स्विकृत नगरसेवक सुरज पाटील महापालिकेतील ‘ब’ प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर, सेल्फ फांऊडेशनचे प्रमोद सोळस्कर, शिवसेनेचे उपविभागप्रमुख प्रल्हाद पाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विनोद पोखरकर, समाजसेवक अमोल मेहेर, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक अंकुश कदम, राहूल गावडे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक पदाधिकार्यांनी शिबिरास भेट दिली.
यावेळी महाराज दर्शन दास चॅरिटेबल ट्रस्ट, राजमुद्रा प्रतिष्ठान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मोरया प्रतिष्ठान, कोलवानी माता मित्र मंडळ, या संस्थांनी रक्तदान शिबिराच्या आयोजनाकरिता जाणता राजा तरूण मित्र मंडळास सहकार्य केले.